जनतेने सरकार बदलायचे ठरवले आहे :- अजित पवार - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 18, 2019

जनतेने सरकार बदलायचे ठरवले आहे :- अजित पवार


मंगळवेढ्यातील सभेत राज्य सरकारवर कडाडून टीका......

मंगळवेढा/प्रतिनिधी

        महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली असेल तरी जनतेने ठाम निर्धार केला असून येणाऱ्या काळात विधानसभेत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नसून या भागाच्या विकासासाठी भारत भालके यांची हॅट्रिक पूर्ण करा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवेढा येथील आठवडा बाजारात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत केले यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे कार्याध्यक्ष उमेश पाटील पी पाटील विजयकुमार खवतोडे चंद्रकांत घुले मुजम्मिल काझी लक्ष्मण तांबोळी भारत बेदरे महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे संगीता कट्टे राहुल घुले यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी माहिती कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या
          शिवसेनेचा आगामी संकल्प पाहिला असता यात महाराष्ट्राचे हित कुठेही दिसत नसून दहा रुपयाला जेवणाचे ताट ही महाराष्ट्राची गरज नाही आहे तर एक रुपयात आरोग्याची तपासणी ही घोषणा म्हणजे निव्वळ फसवणूक आहे आमच्या सरकारच्या काळात आम्ही आर आर आबा यांच्या पुढाकारातून डान्स बंदी करून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याचे वाचवले मात्र या सरकारने डान्सबारला परवानगी दिली अनेक चांगल्या योजना आम्ही आणल्या महात्मा गांधी तंटामुक्त योजना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या योजना देशभरात पोहोचल्या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाड्याने देण्याचे काम हे सरकार करू पाहत आहे येणाऱ्या पिढीला इतिहास समजणार नाही याचे पुढील पिढीला तुम्ही उत्तर काय देणार असे म्हणत अजितदादा यांनी शिवस्मारकची घोषणा केली मात्र एक दगड लावू शकले नाहीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत उदासीनता आहे पाच वर्षात सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत यांचे धोरण नकारात्मक आहे या सरकारने वेगवेगळ्या योजनात घोटाळ्याचे उच्चांक केले असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मंत्र्याला क्लीनचिट देण्याशिवाय पाच वर्षात काहीच काम केलं नाही
          ऊसाचे दर कांद्याचे दर सरकारच्या धोरणामुळे पडले असल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहे ज्वारी गहू यासह शेतमालाला आज दर नाही राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या सरकारने फसवी कर्जमाफी दिली असून पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी दिल्याने शेतकरी पुन्हा उभा राहू शकले होते भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये येत्या वर्षात एक कोटी नोकऱ्या देणार असा उल्लेख केला आहे मग पाच वर्षात काय काम केले याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे नोटबंदी जीएसटी यासारखे निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक कंपन्या उद्योग बंद पडल्याने लाखो लोक बेरोजगारी झाले आहेत. सत्ता आमच्याकडे द्या तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांचे विजेबाबत यांचे धोरण निश्चित नाही लोकांना आकर्षक योजना सांगून निवडणुकीत जोगवा मागण्याचे काम भाजप-शिवसेना सरकारकडून केले जात आहे पवार साहेबांचा राज्य सहकारी बँकेची काडीमात्र संबंध नसताना ईडी सारख्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला जी व्यक्ती महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून काम पहिलेली आहे अशा व्यक्तींवर हे लोक कारवाई करण्याची हिंमत दाखवतात ते उद्या तुम्हाला सुखाने जगू देणार नाहीत याना त्यांची जागा दाखवा.
          आमचे पूर्वीचे सहकारी धनंजय महाडिक कल्याण काळे यांच्या साखर कारखान्यांना जाणीवपूर्वक अडचणी आल्याने त्यांना पक्ष बदलावे लागले. यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर लगेच कारखान्यांना मदत केल्या आहेत. तळागाळातील गोरगरीब वंचित अल्पसंख्यांक समाज भारतीय जनता पक्षाला नकोसा झाला असल्यामुळे सातत्याने त्या घटकांवर अन्याय करण्याची भूमिका हे पक्ष करत आहेत. राज्य सहकारी बँकेचा कारभार 11 हजार कोटीचा असून त्यात  25 हजार कोटीचा घोटाळा होऊच कसा शकतो आणि मग अशी बँक नफ्यात येथे कशी असा प्रश्न करत अजित पवार यांनी पंजाब महाराष्ट्र बँकेतील गैरव्यवहारामुळे बँकेत नव्वद लाख रुपयाची ठेवी असणाऱ्या खातेदाराचा धसका खाऊन मृत्यू झाला या मृत्यूला कोण जबाबदार असा सवाल यानिमित्ताने सभेत उपस्थित केला. या निवडणूक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचे नसल्याने राज्याचे भवितव्य यातून निश्चित होणार असल्याने एकमेकातील मतभेद बाजूला ठेवून आपल्या विचारांची सरकार आणण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन सभेला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना केले
           मंगळवेढा तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी 10 टक्के लोकवर्गणीची अट रद्द करून हि पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले. आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात 65 हजार पोलिसांची भरती केली मात्र गेल्या पाच वर्षांच्या काळात सरकारकडून कोणत्याही भरती न झाल्यामुळे राज्यातील युवकांना काम मिळत नाही याचा जाब या निवडणुकीत मतपेटीतून विचारला पाहिजे जिल्ह्यातील काही जणांना राष्ट्रवादी पक्ष संपला असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज असून नेत्यांच्या निघून जाण्याने पक्ष संपत नसतो तर नव्या दमाची तरुणांची फळी पक्षासोबत काम करत असते वयाच्या 80 वर्ष असणाऱ्या पवार साहेबांसोबत आजचे युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत हे सत्तापरिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाहीत. असे सांगत भारत भालके यांना विजयाचे आवाहन केले यावेळी प्रास्ताविक लतिफ तांबोळी यांनी केले सूत्रसंचालन इंग्रजीत घूले यांनी तर आभार चंद्रकांत घुले यांनी मानले.

Pages