नंदेश्वर येथे आज सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, October 17, 2019

नंदेश्वर येथे आज सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार..मंगळवेढा/प्रतिनिधी

    पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून शिवसेना-भाजप,रासप रिपाइं(आठवले गट) रयतक्रांति संघटनेचे अधिकृत उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ धनगर समाजाचे नेते व युवकांचा बुलंद आवाज गोपीचंद पडळकर यांची आज दिनांक
     18 आॅक्टोंबर रोजी सकाळी ठिक अकरा वाजता नंदेश्वर-गोणेवाडी रोडवरील मैदानात भव्य-दिव्य अशा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
     वंचित आघाडी मधुन नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर हे नंदेश्वर येथील सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचार सभेमध्ये नेमके काय काय मुद्दे घेऊन बोलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
         कोट- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे मतधिक्य सर्वाधिक असुन या मतदारसंघामध्ये आज गोपीचंद पडळकर यांची सभा होणार असुन त्यांच्या सभेमुळे खऱ्या अर्थाने विरोधकांच्या उरात धडधड होऊ लागले.

Pages