ही भालकेची प्रचार सभा नसून विजयी सभा:-डॉ.खा.अमोल कोल्हे.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, October 10, 2019

ही भालकेची प्रचार सभा नसून विजयी सभा:-डॉ.खा.अमोल कोल्हे..


मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा ही संतांची भूमी आहे अन्यायाची चीड आणि सत्याची चाड धरणारी ही समोरील गर्दी बघता भारत भालके यांच्या प्रचार सभेला नसून विजय सभेला आल्याचे वाटत असल्याचे प्रतिपादन डॉ.खा.अमोल कोल्हे यांनी केले ते गुरुवारी मंगळवेढ्यातील आठवडा बाजारात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे महिला जिल्हाध्यक्ष अनिता नागणे विष्णुपंत बागल विजयसिंह देशमुख किरण घाडगे युवराज पाटील विजयकुमार खवतोडे भारत बेदरे लतीफ तांबोळी यांच्यासह मंगळवेढा नगरपरिषदेमधील काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते.
     पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या पाच वर्षात या विद्यमान सरकारने शेतकरी कष्टकरी तरुण महिला कामगार यांना देशोधडीला लावण्याचे काम केले व जातीपातीत भांडण लावून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राने उधळून लावला. रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भूमिका घेतली तोच विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राबवत आलेला असून या निवडणुकीतून जनता पुरोगामी महाराष्ट्राला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
      मंगळवेढा भूमीत येण्याचे भाग्य लाभले आणी पावसाने जंगी स्वागत केले हे शेतकर्‍यांच्या कल्याणाच आहे भालकेनाना जनतेच्या मनातील उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्तृत्व आभाळाएवढे आहे म्हणूनच आज आभाळातून पाणी पडत आहे हा विजयाचा शुभ संकेत आहे चोवीस तारखेच्या नंतर मंगळवेढा परिसरात विजयाची गुढी उभारलेली दिसेल असे सांगत त्यांनीभालके यांना विजयी करण्याचे आवाहन केले
     याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी बोलताना महिलांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षातील उमेदवारांना महिलांनी योग्य जागा दाखवावी असे सांगत महाराष्ट्रातील जे कर्तुत्वान आमदार आहेत त्यात भारत नाना भालके यांचे स्थान अग्रक्रमाने असून हा मतदारसंघ नशीबवान आहे ज्यांना अशा व्यक्तीला मतदान करण्याची संधी मिळत आहे असे सांगत जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी पवार साहेबांना खंबीर साथ देण्यासाठी भारत नाना भालके यांना विक्रमी मतांनी विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी द्या असे आवाहन केले याप्रसंगी आमदार भारत भालके यांनी आपल्या मनोगतात राज्य सरकारने  गेल्या पाच वर्षापासून मंगळवेढ्यातील जनता उपसासिचन योजनेच्या निधी बाबत वाट पाहत आहे माझ्या कार्यकाळात राज्यातील मी एकमेव आमदार असेल ज्याने 18 कोटी रु चा निधी ब वर्ग तीर्थक्षेत्रासाठी आणला लोक म्हणतात तुम्ही पक्ष बदलला आहे मात्र मोठ्या भावाकडून धाकट्या भावाकडे आलोय मात्र माझ्या विरोधात उभे असलेल्या परिचारिकांनी किती पक्षी बदलले हे जाहीर करावे
   ७० हजार कोटीची कर्जमाफ़ी देणाऱ्या पवार साहेबां विषयी बोलतानाजनाची नाही मनाची ठेवावी  असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला मतदारसंघात वीस वर्ष आमदार की भोगलेल्या शिकलेल्या आम्दाराने कधी संत चोखोबाकडे पाहिले नाही मात्र विशेष बाब म्हणून स्थापन केलेल्या
    ग्रामपंचायतला मी चोखोबाचे नाव दिले असून येणाऱ्या काळात रखडलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत पाठवा असे आवाहन केले प्रस्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान पाटील यांनी केले यावेळी पांडुरंग चौगुले महेश पवार यशवंत खताळ आदींनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन भारत  मुढे  यांनी तर आभार अजित यादव यांनी मानले.

Pages