निवडणूक निरिक्षकांची समन्वय व सनियंत्रण कक्षास भेट.. - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 11, 2019

निवडणूक निरिक्षकांची समन्वय व सनियंत्रण कक्षास भेट..


   पंढरपूर/प्रतिनिधी

     भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेले मुख्य निवडणुक निरिक्षक विरेंद्रसिंग बंकावत यांनी  प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे स्थापन करण्यात आलेल्या समन्वय व सनियंत्रण कक्षाला भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वनिल रावडे उपस्थित होते.
     विधानसभा निवडणूकी कालावधीत प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे उमेदवारांच्या आणि नागरीकांच्या सुविधेसाठी अनेक कक्ष सुरु करण्यात आले आहेत. निवडणूक निरिक्षक बंकावत यांनी येथील तक्रार निवारण कक्ष, उमेदवारांना द्यावयाच्या विविध परवानग्या देणारा कक्ष, आचार संहिता कक्ष, संगणिकीय व तांत्रिक मदत कक्ष, खर्च नियंत्रण कक्ष आदींना भेट दिली. प्रत्येक कक्षाचे कामकाज आणि आलेल्या तक्रारी व तक्रारीचे निराकरण याची माहिती जाणून घेतली व आवश्यक सुचना दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी सर्व कक्षाच्या कामकाजाबाबतची माहिती निवडणूक निरिक्षकांना दिली इव्हिएम व व्हिव्हिपॅट मतदान यंत्राची  व्दितीय सरळमिसळीकरण  प्रक्रिया
       पंढरपूर विधानसभा संघासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीनचे व्दितीय सरळमिसळीकरण (Randomization) प्रक्रिया प्रांत कार्यालय येथील सांस्कृतिक भवन येथे निवडणूक निरिक्षक बंकावत यांच्या समोर करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी उपस्थित उमेदवारांना व प्रतिनिधींना सदरील प्रक्रीया ऑनालाईनव्दारे कशा पध्दतीने करण्यात येते त्याबाबत माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार उपस्थित होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  स्वप्निल रावडे, डॉ.वैशाली वाघमारे , निवडणूक नायब तहसिलदार सुरेश तिटकारे उपस्थित होते.

Pages