मंगळवेढा पोलिसांकडून दडपशाही माजी सैनिक व स्वाभिमानीचे पदा धिकारी ताब्यात .. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, October 10, 2019

मंगळवेढा पोलिसांकडून दडपशाही माजी सैनिक व स्वाभिमानीचे पदा धिकारी ताब्यात ..



 मंगळवेढा/प्रतिनिधी

      मंगळवेढा  येथे आज दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भाजपा युतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या निवडणूक प्रचारार्थ सभा होणार असून त्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा पोलिसांनी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह काही माजी सैनिकांना पोलिसांनी कोणतेही कारण न देता ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसवले होते व परत दोन तांसानी त्याना सोडण्यात आले या मुळे तीव्र संताप व्यक्त होत असून मंगळ पोलिसांकडून सुरू असलेल्या दडपशाही बाबत तीव्र संताप  व्यक्त होत आहे
       याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा  येथे भाजपा माहिती उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आज मंगळवेढा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सभा होणार आहे या सभेत  आमदार प्रशांत परिचारक यांनी  माजी सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेले वक्तव्य केल्याने माजी सैनिकाकडून व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काळे झेंडे दाखवण्याची शक्यता असल्याच्या कारणावरून पोलिसांनी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अँड.राहुल घुले यांना सकाळी घरातून कोणतेही कारण न देता पोलीस ठाण्यात आणून बसवले होते  तसेच माजी सैनिक संघटनेचे मल्लय्या स्वामी, मुरलीधर घुले यांच्यासह काही माजी सैनिकांना पोलीस ठाण्यात आणून बसवले होते नंतर दोन तासानी सोडण्यात आले आहे.
      याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुल घुले यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांकडून दडपशाही सुरू असून मला सकाळी कोणतेही कारण नसताना उपविभागीय पोलिस अधिकारी आपल्याशी बोलणार असल्याचे सांगून पुजारी व ढोबळे नामक पोलिसांनी  आपल्याला मंगळवेढा पोलिस ठाण्यात आणून बसविले आहे यामुळे आपण पोलिसांना विचारले असता काही सांगितले जात नाही त्यामुळे माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करून पोलिस दडपशाहीचा वापर करत असल्याचे घुले यांनी सांगितले तसेच परिचारक यांनी माजी सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेले वक्तव्यामुले माजी सैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही राडा करू नये यासाठी पोलिसांकडून ही काळजी घेतली जात असल्याचे समजते तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या विरोधात पोलीस ठाण्यात आणून बसवले होते व परत दोन तांसानी त्याना सोडण्यात आले यांमुळे कार्यकरते आक्रमक झाल्याचे दिसून येत असल्याने या कार्यकर्त्यांनी व्यत्यय आणू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे याबाबत पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मुख्यमंत्री यांच्या सभेच्या ठिकाणी असून येथील मैदानाची पाहणी करत असल्याचे सांगितले

Pages