राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी- आ.भारत भालके - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, October 9, 2019

राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी- आ.भारत भालके


मंगळवेढा/प्रतिनिधी
          विद्यमान सरकारने दिलेल्या कर्जमाफीपासून अनेक शेतकरी वंचीत असून राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे  विरोधक  विकासाच्या केवळ पोकळ गप्पा मारून विकासकामाना आडकाठी आणण्याचे पाप त्यांनी केले असून त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही लोकप्रतिनिधी या नात्याने  शेतकरी, सर्वसामान्य,दीनदलितांच्या विकासासाठी विधानसभेत सातत्याने आवाज उठवून  न्याय देण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षांत केला आहे त्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आणण्यासाठी व  मतदारसंघाचे विकासाचे प्रश्न विधानसभेत मांडून त्या प्रश्नासाठी पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला निवडून देण्याचे आवाहन आ.भारत भालके यांनी मंगळवेढा येथील विविध गावामध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त केले.
       राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार आ.भारत भालके यांनी ढवळस धर्मगाव उचेठाण पठाण ब्रह्मपुरी माचनुर रहाटेवाडी मुंढेवाडी  या गावात प्रचार सभांचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते मंगळवेढा तालुक्यातील प्रचार दौऱ्याचा शुभारंभ ढवळस येथून करण्यात आला प्रत्येक गावात आ.भारत भालके यांचे मतदारांनी मोठ्या उस्फूर्तपणे स्वागत केले तसेच सर्व गावातून महिलांनी औक्षण करून नाना तुम्हीच पुन्हा आमदार म्हणून निवडून येणार असल्याच्या भावना त्यांनी  व्यक्त केल्या
       यावेळी बोलताना आ.भारत भालके म्हणाले की मतदारांच्या आशीर्वादामुळे एका शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेत पाठवून येथील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ताकद मला दिल्याने  या माध्यमातून मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील शेतीचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ३५ गावची योजना मंजूर करून घेतली परंतु विरोधकांनीही योजना बोगस असल्याचे सांगितले परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाने या सरकारने निधी देण्याचे मान्य केले परन्तु नवीन प्रशासकीय मान्यता देण्याचा घाट घालत  या योजनेतील काही गावे व पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु यास आपण विरोध केल्याने मूळ योजना राबवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत तसेच दक्षिण भागातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा दूर करण्यासाठी चाळीस गावांसाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबवून या भागातील महिलांना पिण्याचे पाणी दिले त्याचे आपणास समाधान आहे त्यामुळे या भागातील जनतेचा आशीर्वाद आपल्या सोबत राहणार आहे तालुक्यात वीज टंचाई दूर करण्यासाठी व अखंडितपणे विज राहण्यासाठी सहा ते सात नवीन स्टेशन उभारणी केली तसेच भांळवणी येथे १३२ के व्ही ए चे वीज केंद्र तसेच शेतकऱ्यांना पीक विमा चारा छावण्या, पाण्याचे टँकर ,उजनीचे पाणी देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला तालुक्यासाठी अनेक शासकीय कार्यालय खेचून आणले तालुक्यातील तीर्थक्षेत्र ,रस्ते विकसित  करण्यासाठी निधी आणला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून दिला तालुक्यात  बचत गटाची चळवळ व महिला रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत आपण पैसे मिळविण्यापेक्षा माणसे जोडली आहेत ही माणसे म्हणजेच माझी संपत्ती असून हीच माणसे मला विधानसभेत पाठवून देणार असून त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपण प्रयत्न करणार आहे ज्यांनी उमेदीच्या काळात पंचवीस वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केले त्यांनी केवळ दोन प्रश्न विचारून निष्क्रिय पणा दाखविला परंतु आपण दहा वर्षात जनतेच्या हिताचे २६७ प्रश्न विचारले व  ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला ज्यांना भाषण करताना दोघांनी धरून ठेवावे लागते ते विधानसभेत काय बोलणार याचा जनतेने विचार केला पाहिजे ज्यांनी सैनिकांच्या पत्नी बद्दल वापरून महिलांचा अपमान केला आहे ते कोणत्या तोंडाने मत मागत आहेत ज्यांना विधानपरिषदेत जाता आले नाही व मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहे असे सांगून विकासकामांना आडकाठी आणली  त्यांना निवडून देणार का ? तसेच घरात एक आमदार असताना दुसरी कशासाठी असा प्रश्न त्यांनी या वेळी करीत परिचारकांचा चांगलाच समाचार घेतला तसेच यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना त्यांच्या कुवती पेक्षा पवार साहेबांनी जास्त देऊन देखील एकेकाळी पवार साहेब यांनाच बाप मानणाऱ्या ढोबळेकडून पवार साहेबावर टीका केली जात आहे  ज्या माणसाला येथील जनतेने वीस वर्षे निवडून दिले असताना त्यांनी येथील जनतेला पाणी प्रश्नावरून केवळ खेळवत ठेवले व जनतेच्या विकासाऐवजी स्वताच्या  विकास करीत सव्वाशे संस्था काढून गोरगरिबांना डोनेशन घेऊन प्रवेश दिला ज्यांना आयुष्यभर नावे ठेवली आता त्यांचे उंबरठे झिजवत असल्याची टीका ढोबळे यांच्यावर केली
          या दौऱ्यात  प्रत्येक गावामध्ये आ.भारत भालके यांचे उस्फूर्तपणे स्वागत करून त्यांना   निवडणुकीसाठी  नागरिकानी लोकवर्गणी गोळा करून ढवळस येथे ११ हजार,धर्मगाव येथे ११ हजार बठाण १५ हजार उचेठाण ११ हजार माचणूर ५१ हजार ब्रम्हपुरी १० हजार मुढेवाडी २१ हजार रुपये देण्यात आले या दौऱ्याच्या वेळी तानाजी खरात नितीन नकाते, सचिन नकाते, ईश्वर गडदे, रामभाऊ वाकडे, भारत बेदरे, पांडुरंग चौगुले, यशवंत खताळ, जगन्‍नाथ रेवे ,चंद्रकांत घुले, ज्ञानेश्वर पुजारी, अशोक पाटील, मारुती कुचेकर, प्रवीण खवतोडे, राहुल सांवजी, संकेत खटके, महादेव जाधव, भारत नागणे, मुजम्मिल काझी, तानाजी पाटील, धनंजय पाटील, विकास पुजारी, अर्जुन पाटील, सुरेश कोळेकर, युवराज शिंदे ,महेश दत्तू, प्रज्वल शिंदे, समाधान हेंबाडे, युवराज घुले, महादेव फराटे, अरुण पवार ,वसंत घोडके,अल्ताफ सुतार रमीजराजा मुल्ला आदी उपस्थित होते.

Pages