निर्भय, मुक्त व शांततामय वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज:-जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले - Divyaprabhat News

Breaking News

Monday, October 7, 2019

निर्भय, मुक्त व शांततामय वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज:-जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेसोलापुर/प्रतिनिधी

विधासनभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत जिल्ह्यातील 11 विधासनसभा मतदारसंघात दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होऊन दि. 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. ही मतदान प्रक्रिया निर्भय, मुक्त व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिका-यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते, यावेळी सर्वसाधारण निवडणूक निरिक्षक शिवराजसिंग वर्मा ( करमाळा व माढा), अरुण प्रकाश ( बार्शी, मोहोळ), विरेंद्रसिंग बकावत ( पंढरपूर, सांगोला, माळशिरस), टी.नामग्याल भुतिया ( अक्कलकोट, दक्षिण सोलापूर), श्रीधर चव्हाण ( सोलापूर शहर उत्तर व सोलापूर शहर मध्य),  पोलीस निरिक्षक श्रीमती विभु राज, पोलीस आयुक्त शहर अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यासह सर्व निवडणुक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
        जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी निवडणूक निरिक्षकांना जिल्हा प्रशासनाची निवडणूक तयारीची माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यात 34 लाख 21 हजार 324 मतदार असून 3 हजार 521 मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक मतदानकेंद्र हे सखी मतदार केंद्र म्हणुन निवडण्यात आलेले आहे. या मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी - कर्मचारी असतील. त्याचप्रमाणे 87 संवेदनशील मतदान केंद्र असल्याचे सांगून 13 हजार 82 दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
        जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणूका घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून 6 हजार 550 एवढे बॅलेट युनिट, 4 हजार 710 कंट्रोल युनिट आणि 5 हजार 310 व्हीव्हीपॅट मशिन प्राप्त झालेले असून सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. तसेच मतदान जनजागृतीसाठी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात स्वीप अंतर्गत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
   यावेळी सर्वसाधारण निरिक्षक श्री. भुतिया यांनी मतदानादिवशी मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी केंद्रातील अधिका-यांकडून जो मॉक पोल घेण्यात येतो तो पोल पूर्ण झाल्यानंतर तात्काळ खोडून टाकावा अन्यथा मॉक पोल तसाच राहिल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी निर्देशित केले.
       सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांनी मशीन  व निवडणूक कर्मचा-यांची पहिली सरळ मिसळ प्रक्रिया पूर्ण केली असेल व दुसरी प्रक्रिया आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक निरीक्षकांसमोर पूर्ण करावी, असे निर्देश निरीक्षक विरेंद्रसिंग बंकावत यांनी दिले.  त्याप्रमाणेच मतदान केंद्रामध्ये कोणत्याही इलेक्टॉनिक वस्तु घेऊन जाता येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
         सर्व विधानसभा मतदारसंघात आयोगाच्या निर्देशाप्रमाणे एस.एस.टी., व्ही.एस.टी. पथके कार्यरत असून आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणेच मोठया रक्क्माचंचे व्यवहार, देवाण-घेवाण व दारु वाहतुक यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे, असे निर्देश निरीक्षक श्रीधर चौहान यांनी दिली. त्याप्रमाणे जिल्ह्यातील मतदारांपर्यंत ‘स्वीप’ अंतर्गत पोहाचून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात निवडणूका जाहीर झाल्यापासून ते मतदान व मतमोजणी पर्यंत पालिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. त्याकरीता आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी व कायदा -सुव्यवस्था नियंत्रणात ठेवून मतदारांनी मतदानाच्या प्रक्रिययेत निर्भयपणे सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याप्रमाणेच जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकरीता दक्ष रहावे, असे निर्देश आयोगाच्या निरीक्षक (पोलिस)  श्रीमती विभू राज यांनी दिली.
      प्रारंभी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्ह्यातील निवडणूक नोडल अधिकारी यांनी निवडणूक निरीक्षकांना परचिय देऊन निवडणूक कालावधीत देण्यात आलेल्या जबाबदारीची संक्षिप्त माहिती दिली. शेवटी उपस्थित सर्व निवडणूक निरीक्षक , जिल्हास्तरीय अधिकारी, नोडल अधिकारी यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी आभार मानले.

Pages