मंगळवेढा तालुक्यातील ४६ गावासाठी पाणी मिळवून देण्यासाठी परिचारक सक्षम.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, October 13, 2019

मंगळवेढा तालुक्यातील ४६ गावासाठी पाणी मिळवून देण्यासाठी परिचारक सक्षम..


अँड.नंदकुमार पवार यांचा परिचारक गटाला पाठिंबा..

मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील ४६ गावासाठी पाणी मिळवून देण्यासाठी सुधाकरपंत परिचारक हे सक्षम असून त्यांनी ठोस आश्वासन दिले असल्यामुळे आपण परिचारक गटाला पाठिंबा देत असल्याचे दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी सभापती अँड.नंदकुमार पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.७ ऑक्टोबर रोजी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. तालुक्यातील ८१ गावांपैकी उजनी लाभक्षेत्रातील ३५ गावे सोडुन उर्वरीत दक्षिण व पश्चिम भागातील ४६ गावासाठी पाणी मिळवून देण्यासाठी जो उमेदवार सक्षम असेल व ठोस आश्वासन देईल आशा उमेदवारास पाठींबा देण्याचे ठरले होते.
         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत तालुक्यातील सिंचनापासून वंचित असणाऱ्या 46 गावाच्या सिंचन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले होते.यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिवाय ३५ गावाची म्हणून जी उपसा सिंचन योजना समजली जाते ती ३५ गावाची नव्हतीच आत्ता फक्त ९ गावेच त्या योजनेत प्रस्तापित आहेत. दक्षिण पश्चिम भागातील सिंचनापासून वंचित असणाऱ्या म्हैसाळ योजनेसह ४६ गावाच्या पाण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.
यासाठी सत्ताधाऱ्याचे पाठबळ असावे म्हणून परिचारक यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे आम्ही पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Pages