विधानसभेसाठी एक संधी द्या; पंढरपूर - मंगळवेढाचा चेहरामोहरा बदलून :- प्रा.शिवाजीराव काळुंगे.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, October 13, 2019

विधानसभेसाठी एक संधी द्या; पंढरपूर - मंगळवेढाचा चेहरामोहरा बदलून :- प्रा.शिवाजीराव काळुंगे..


मंगळवेढा/प्रतिनिधी

       विधानसभेसाठी एक संधी द्या; पंढरपूर - मंगळवेढा तालुक्याचा विकासाच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलून दाखवतो असे मत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे विधानसभा निवडणूकीनिमित्त मंगळवेढा तालुक्यातील अकोला, गणेशवाडी, शेलेवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे, शिरसी, जुनोनी, खुपसंगी, पाठखळ, कचरेवाडी,व मंगळवेढा येथे शनिवार पेठ व शिवाजी तालिम
आदी गावभेटीचा दौरा रविवार दि.13 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले, समाजकारण आणि राजकारण हे जनहितासाठी असावे जनता हीच आपल्यासाठी सर्वस्व आहे जनतेचा सर्वांगीण विकास हा आपला मुद्दा असून हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढे काम करत आलो आहे.
        दूरदृष्टी ठेऊन मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात आर्थिक सहकार चळवळीसाठी धनश्री महिला व धनश्री मल्टीस्टेटची स्थापना केली. या माध्यमातून शअनेक गरजूंना आर्थिक भांडवल उभा करून त्यांची गरज पूर्ण केली.स्वयंसहायता बचत गटातून महिलांना स्वावलंबी करण्याचा उद्देश ठेवूनच धनश्री परिवाराने बचतगटांच्या सुप्त क्रांतिकारी चळवळीत पुढाकार घेवून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले.
           मंगळवेढा तालुक्याचा दक्षिण भाग हा गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी भाग आहे. पाणी परिषदेच्या माध्यमातून मी गेल्या अनेक वर्षांपासून या भागाला पाणी मिळावे म्हणून प्रयत्नशील आहे. ज्या दुष्काळी भागांना पाणी मिळण्यासाठी पाणी परिषदेची स्थापना करण्यात आली त्या सर्व गावातील व भागांतील  अधिक प्रमाणात पाणी मिळवून देण्याचे काम केले आहे पण मंगळवेढा तालुक्याला मात्र आजपर्यंत पाणी येऊ शकले नाही म्हणून आम्ही गतवर्षी मंगळवेढा येथे पाणी परिषद आयोजित करून सुमारे ८० हजार शेतकऱ्यांना एकत्रित केले . तसेच हुन्नुर येथे १० हजार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विभागीय पाणी परिषद घेतली. म्हणूनच मंगळवेढा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हुन्नूरच्या ओढ्यात म्हैसाळचे पाणी बघायला मिळाले. म्हैसाळचे पाणी ओढ्यात पोहोचल्यानंतर पाणी पूजन करण्यासाठी अनेकांनी संधी साधली. पण म्हैसाळचे पाणी मंगळवेढ्यात येण्यासाठी आमचा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे हे सर्वांनाच माहित आहे. मंगळवेढा व पंढरपुरात काँगेसची चांगली ताकद आहे धनश्री परिवाराच्या माध्यमातून हजारो लोक जोडले आहेत त्यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघावर मंगळवेढ्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे तसेच मी आजवर काँगेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केलेले आहे
        मंगळवेढा तालुका स्वातंत्र मिळाल्यापासून आज तागायत काँगेसच्या विचाराचा वारसा सोबत घेऊन स.1967 व 1972 पंचवार्षिक वगळता 2009 पर्यत मतदार संघ राखीव असल्याने व मतदारसंघ खुला झाल्यानंतर तालुक्याला बाहेरून आलेले नेतृत्व लाभले आहे परंतु आता आपण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व मतदारसंघातील रखडलेली विकसाकामे, 35 गाव पाणीप्रश्न, रस्ते, पिण्याचे पाणी यांसारखे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. आपण कायम जनतेच्या सानिध्यात असल्याने जनतेचे सर्व प्रश्न त्यांची सुख दुःखे माहीत आहेत आपणाला या मतदारसंघातून संधी मिळाल्यास प्राधान्याने मंगळवेढ्याच्या नशीबी असलेला शेकडो वर्षाचा दुष्काळ हटविण्यासाठी पाणीप्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवू शकतो. यासाठी आपल्या हातात सत्ता असणे आवश्यक आहे. ही सत्ता मतदारांनी द्यावी असे त्यांनी यावेळी आवाहन केले याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड, विठ्ठल काळुंगे, वसंत गरंडे , अक्षय टोमके, परमेश्‍वर घुले, शिवाजी काळे आदीनी आपले मनोगत व्यक्त केले व विविध गावातील संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व गावकरी  मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages