महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कलम 370 .... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, October 13, 2019

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कलम 370 ....





पंढरपूर/प्रतिनिधी

        सध्या महाराष्ट्रात निवडणुकीच्या  प्रचाराचे  वारे जोरात वाहत असून प्रचाराचा धुमशान  घातला असून अनेक जण आपापली सीट वाचवण्यासाठी,  जिंकण्यासाठी पक्षातील गडाडणाऱ्या तोफा आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी धुडकवत आहेत . अनेकजण  आपल्या भागातील प्रसिद्ध असणारा , बोलणारा ,मुद्दा उचलणारा नवआश्वासन देणारा ,तसेच आपल्या मतदारसंघातील प्रश्न समस्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही देणारा नेता बोलवत आहेत .या मुद्द्याचा उल्लेख होऊन त्या आशेने या गडगडणाऱ्या तोफांचा आवाज ऐकण्यासाठी शेतीतील कामे सोडून ,हातातील कामे सोडून सभेच्या  ठिकाणी गर्दी करत आहेत .तर या सभेच्या ठिकाणी अनेक नेते एकमेकांच्या उखापाखाळ्या काढण्यात दंग आहेत एकीकडे  मागील पाच वर्षात काय केलं आणि दुसरीकडे तुम्ही पंधरा वर्षात काय केलं अशा त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा आहे तो कलम 370चा भारत देशातील लोक भावनिक असल्यामुळे राष्ट्रीयतेचा मुद्दा निघाला की अनेकजण  भावनिक होत असून याच भावनेने  हे मतदार आपले  मत देत असतात ते इतिहासाकडे डोकावून पाहिले की समजते तसेच राष्ट्रवादाचा मुद्दा अनेक भारतीयांना हा अस्मितेचा मुद्दा बनत असून तो अस्मितेच्या मुद्याला भावनिक मुद्दा बनवून त्याचे राजकारण सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहायला मिळत आहे .
     कलम 370 चा विचार केला तर याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला कलम 370 मुद्द्याचा जोराने उचलू पाहत आहेत आणि  प्रचाराचा मुद्दा बनवत असून याचा काही ठिकाणी भावनिक मतांच्या दृष्टीने युतीला त्याचा  फायदा होऊ शकतो तोट्याचा विचार केला तर आघाडीला या मुद्द्याच्या दृष्टिकोनातून थोडाफारसा  तोटा होऊ शकतो पण आघाडीने ह्या मुद्द्याला तोडीस तोड प्रचार केला तर आघाडी होणारा तोटा रोखू शकते.
      कलम 370 मतांच्या परिवर्तनाचा मुद्या   होणार का असे विचारले तर अनेक जण सांगताहेत की ह्या  मुद्द्यामुळे मतांचं  परिवर्तन होऊ शकते  तर काहीजण सांगतात या मुद्द्याचे महाराष्ट्रात काय काम.. आज महाराष्ट्रातील प्रचारात  370  हा मुद्दा होत असून याद्वारे मत परिवर्तनाचा प्रमुख मुद्द्यांपैकी एक मुद्दा बनत आहे.

Pages