नवसाने आलेेले हे सरकार :- धनंजय मुंंडे - Divyaprabhat News

Breaking News

Monday, October 14, 2019

नवसाने आलेेले हे सरकार :- धनंजय मुंंडे


कासेगांवमध्ये राष्ट्रवादीच्या सभेला उसळला जनसागर...

                पंढरपूर/प्रतिनिधी 

           पूरोगामी राज्याने असे लबाड सरकार यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. कारण राज्यात कुठेही विहिरी, शेततळे, वृक्षलागवड दिसत नाही. आणि हे सर्वजर पहायचे असेल तर त्याकरीता भाजपची पूण्यवान नजर लागते. फसवी कर्जमाफी देऊन सरकारने शेतकरी या जातीचा अपमान केला आहे. त्यामुळे शिवरायांचा अपमान करणारे देवेंद्र फसवणीस यांचे महायुतीचे सरकार हे नवसाने आलेले सरकार आहे. यांच्यातील काही औलादी आमच्या नेत्याला संपवायला निघाले आहे. वय 54 असणारा अमित शहा आज साहेबांचे काम विचारतोय, पण आमच्या साहेबांनी राज्यात जेवढे विमानतळ निर्माण केले तेवढे बसस्टॅण्ड अमित शहाने गूजरातमध्येतरी बांधले आहेत का? साहेबांचे मावळे आज जिवंत आहे, आणि याच निवडणूकीत ते तूम्हाला संपवणार आहेत. पवार साहेब समजायला तूम्हाला 10 वर्ष लागतील असे सांगत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
                कासेगांव ता. पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भारत तुकाराम भालके यांच्या प्रचारार्थ ना.धनंजय मुंडे यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठ्या संख्येने तरूणाईसह अबाल वृध्द उपस्थित होते. एकच बाणा भारतनाना यंदा हॅट्रीक होणारच असा नारा सभेमध्ये घूमत असल्यामुळे सर्व वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.
                   यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, साहेबांच्या प्रत्येक सभेत 80% तरूणाई उपस्थित राहत आहे. त्यामुळे हादरलेल्या दिल्लीने ईडीची पूडी आणली. परंतू साहेबांनी ईडीचे तोंड बंद केले. 5 वर्षापूर्वी ज्यांचे राजकारण सुरू झाले ते साहेबांबद्दल बोलत आहे. परंतू यांना साहेब समजायला 10 जन्म घ्यावे लागतील. चंद्रकांत पाटलांमध्ये हिंमत असती तर त्यांनी ज्या ठिकाणी भाजप कधीच निवडून येत नाही, त्या ठिकाणी उभे राहण्याची हिंमत दाखवली असती. पूर्ण पदवीधर मधून पून्हा उभा राहण्याची हिंमत नसल्यामुळे चंपा कोथरूडमध्ये गेले आहेत. फडणवीस 10 - 10 वेळा पवार साहेबांच्या पाया पडले आहेत. त्यामुळे कुणीही साहेबांचा नाद करू नये, कारण तुमच्यावर साहेबांच्या राजकारणाचा डाव पडला तर तुमचे राजकारणच संपेल. फडणवीस साहेब आम्ही कुस्ती खेळायला तयार आहोत, पण कुस्ती अगोदर परत फक्त दंड बैठका मारण्याची शर्यता लावू, कोण जिंकतय मग बघा. आमच्यातून सरदार सेनापती गेले पण इमानदार मावळे आजही साहेबांसोबतच आहे. भारतनाना व साहेबांचे नाते विठ्ठल व वारकर्‍यांचे झाले आहे. मेगा भरतीच्या नावाखाली सरकारने तरूणाईची फसवणूक करत 5 वर्षात राज्य उध्वस्त करून टाकले. आमचे सरकार सत्तेत आल्यास पहिल्या 3 महिन्यात आम्ही 1 लाख सरकारी पदे भरणार आहोत. सैनिकांचा अपमान करणार्‍यांना मी सभागृहात पाय ठेवू दिले नव्हते. नाना आता तूम्ही साहेबांच्या मनात पक्के घर केले आहे. त्यामुळे आता दोन ठिकाणी स्टम्प मोडून तिर्‍यांदा हॅट्रीक तूमची नक्कीच होणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी सांगितले.
                   सोमवार दि.14 ऑक्टोबर रोजी मुंढेवाडी, गोपाळपूर, अनवली, एकलासपूर, सिध्देवाडी, तावशी, तनाळी तप.शेटफळ, कासेगांव व नंतर कोर्टी, बोहाळी, उंबरगांव, खर्डी या गांवामध्ये उमेदवार श्री भारतनाना भालके यांच्या प्रचार सभा पार पडल्या. या सभेला मोठ्या संख्येने तरूणांसह अबाल वृध्दांनी गर्दी केली होती.
                    सदरवेळी मौजे कासेगांव, ता.पंढरपूर येथील सर्वश्री पं.स.मा.उपसभापती विजयसिंह देशमुख, सरपंच बाबु धोत्रे,  दाजी देशमुख, तुकाराम कचकल, माणिक गंगथडे, लक्ष्मण जाधव, वैभव लिंगे, सिकंदर जमादार, रूबीन इनामदार, नागनाथ जाधव, सज्जन जाधव, अर्जुन खिलारे, नागनाथ कळकुंबे, अंकुश डांगे, पांडुरंग भुसे, सिकंदर मुलाणी यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Pages