खर्च सादर न करणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, October 12, 2019

खर्च सादर न करणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस..
   पंढरपूर/प्रतिनिधी

          पंढरपूर विधानसभा मतदार संघातील एक उमेदवार खर्च तपासणी वेळी अनुपस्थित राहिल्याने तसेच दोन उमेदवाराच्या दैनंदिन निवडणूक खर्चामध्ये त्रुटी आढल्याने एकूण तीन उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
       पंढरपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी उमेदवारांना कळविण्यात आलेल्या वेळेनुसार खर्च निरिक्षक राधनाथ पुरोहित यांच्या उपस्थित शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे करण्यात आली.  या तपासणीमध्ये  इंडीयन नॅशनल कॉग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव काळुंगे व भारतीय जनता  पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या दैनंदिन निवडणूक खर्चामध्ये त्रुटी आढल्याने  त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच अपक्ष उमेदवार सुनिल सुरेश गोरे खर्च तपासणी वेळी अनुपस्थित राहिले. तसेच त्यांनी दैनंदिन निवडणूक खर्च सादर केला नाही व दैनंदिन खर्चाची नोंदवहीसुध्दा सादर केली नसल्याने त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. संबधित उमेदवारांनी  नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
        पंढरपूर विधानसभा मतदार संघातील  खर्च निरिक्षक राधनाथ पुरोहित यांनी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करुन खर्च तपासणी पथकातील सर्व सदस्य, उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक खर्च सादर करण्याबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

                             

Pages