पंढरपूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, October 1, 2019

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण...



    पंढरपूर/प्रतिनिधी

    विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 
साठी 252-पंढरपूर विधानसभा मतदासंघात नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, सहा.मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे  पहिले प्रशिक्षण दाते मंगल कार्यालय, सांगोला रोड, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आले होते.

           सदर प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले असून, 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली वाघमारे व गटविकास अधिकारी रविकिरण यांनी नियुक्त अधिका-यांना व कर्मचां-याना सविस्तर प्रशिक्षण दिले. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, निवडणूक नायब तहसिलदार सुरेश तिटकारे, सुधाकर धाईंजे उपस्थित होते.
या प्रशिक्षणास मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी श्री.ढोले  यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया सरळ व सोपी व्हावी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी यांना कोणतेही अडचण येऊ नये यासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचा-यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. नियुक्त कर्मचा-यांनी सांघिक भावनेने काम करावे. निवडणुकीचे कामकाज निपक्ष व आत्मविश्वासाने पार पाडावे तसेच निवडणुकीच्या कामात कोणीही टाळाटाळ करु नये. कामात कसूर केल्यास  किंवा जबाबदारी टाळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल. या प्रशिक्षणास निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी  गैरहजर राहिल्याने त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही श्री. ढोले यांनी सांगितले.
 निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार जागृतीसाठी मतदारसंघात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन तसेच ‘ व्हीव्हीपॅट व ‘ईव्हीएम’  मशीन आदीबाबत माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी द्यावी असे यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. वैशाली वाघमारे यांनी सांगितले. तसेच सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट पेपर व्दारे मतदान करण्याचे आवाहनही गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी यावेळी केले.
यामध्ये पहिल्या सत्रात 854  व दुस-या सत्रात 854 कर्मचा-यांचे प्रशिक्षण  ठेवण्यात आले होते. यावेळी  लोटस इंग्लिश स्कुल येथे मतदान अधिकारी व कर्मचारी यांना ‘ व्हीव्हीपॅट व ‘ईव्हीएम’  मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून  प्रत्यक्ष हाताळणी बाबत प्रशिक्षण दिले.                

Pages