उमेदीच्या काळात 25 वर्षे सत्तेत असणाऱ्यानी विकास केला नाही ते आता काय दिवे लावणार:-आ.भारत भालके - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, October 2, 2019

उमेदीच्या काळात 25 वर्षे सत्तेत असणाऱ्यानी विकास केला नाही ते आता काय दिवे लावणार:-आ.भारत भालके


मंगळवेढा/प्रतिनिधी

          ज्यांनी उमेदीच्या काळात 25 वर्षे सत्ता भोगली त्यावेळी मतदारसंघाचा विकास केला नाही ते आता या वयात मतदार संघाचा काय विकास करणार असा सवाल करीत
गेल्या दहा वर्षात प्रकृतीचा विचार न करता मतदारसंघाच्या विकासासाठी झटल्याने अनेक जिवाभावाची  माणसे कमावली हीच माझी संपत्ती आहे. जनतेने मला कौल दिला जनतेसाठी झटणारा आमदार कोण आहे हे मला सांगण्याची गरज नाही त्यामुळे माझा पक्ष प्रवेश झाल्यापासून मिळणारा उस्फुर्त पाठिंबा माझ्या विजयाची नांदी ठरत आहे असल्याचे पंढरपुर विधानसभेचे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे आ.भारत भालके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले 
 आ.भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढ विण्याचे जाहीर केल्यानंतर ते आज मंगळवेढा येथे कार्यकर्त्यांच्या भेटीला आले असता दामाजी पुतळ्यापासून जल्लोषात त्यांचे स्वागत  करण्यात आले त्यानंतर ते
पत्रकारांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले
आघाडी सरकारच्या काळात मंगळवेढ्यातील तहानलेले 41 गावांना पिण्याची पाण्याची योजना लोकवर्गणीची अट शिथिल करून मंजूर करून घेतली. गणपतराव देशमुख यांनी विक्रमी काळ आमदारकी मिळवली आजही लोकांच्या हृदयात त्यांचेच स्थान आहे ते सत्तेचे सोबती नसतानादेखील मतदारसंघातील कामाबाबत लढा देत राहिले त्यांच्या लढाऊ बाण्याचा त्यांच्या मतदारसंघाला अभिमान वाटतो असे आ.भालके  यांनी सांगत मतदार संघातील आमदाराचे मेरिट हे विधानसभेतील कामगिरीवरून व जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणूकी वरून निश्चित केले जावे. ज्यांना पंचवीस वर्षे आमदारकी दिली महामंडळ दिले आज त्यांना लोकांनी त्या कार्यकाळात काय कामगिरी केली. याबाबतचे मूल्यमापन केले पाहिजे पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आता  सेनेला राहिला नसून कडकनाथ कोंबडीच्या वाट्याला हा मतदारसंघ गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत विचारले असता आ.भालके यांनी मी कधीही भाजप मध्ये उमेदवारी मिळण्याबाबत प्रयत्नशील नव्हतो असे सांगत  पवार साहेबांच्या विचारसरणीच्या मतदारसंघात चुकीचे पाऊल टाकणार नव्हतो मात्र सगळे डाव लवकर समोर आणून चालत नसतात यामुळे योग्य वेळी मी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले. 2004 नंतर कधीही मातोश्रीवर गेलो नाही मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व मला नेहमी भावते. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांना भेटावयास गेलो होतो तसेच मुख्यमंत्री फडवणीस व विखे पाटील हे चहा पान घेण्यासाठी आपल्याकडे आले असता त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला पंढरपूर तालुक्यातील 22 गावे व मंगळवेढा तालुका 2009 ,2014 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहिले आहेत. राजू शेट्टी व काँग्रेसमधील अनेकांनी मला माझ्या निर्णयाबद्दल शुभेच्छा दिल्या असून धर्मनिरपेक्ष विचारधारा आपण जोपासली असल्याचे त्यांनी सांगत येणाऱ्या निवडणुकीत देखील पंढरपूर मधून मला भरघोस मतदान मिळणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीही जात धर्म पंथ गट उजवा डावा न पाहता सगळ्यांना सोबत घेऊन काम केले आहे लोकांच्या मनातील निर्णय मी घेतला असून हा निर्णय योग्य असल्याचे मतदार मतदानातून दाखवून देतील असे त्यांनी सांगितले
     ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा असता तर मंगळवेढा ,पंढरपुर, मोहोळ या भागातील गावातून सुशील कुमार शिंदे  यांना मताधिक्‍य मिळाले नसते या मतदारसंघातील लोकशाहीच्या विचारधारेने मतदारराजाने दिलेले पवित्र मत कोणतीही ईव्हीएम मशीन बदलू शकणार नाही त्यामुळे विरोधकांकडून सुरू असलेल्या गोबेल्स नीतीचा वापर मतदार म्हणून पडतील असे भालके यांनी ठासून सांगितले. गुरुवारी साधेपणाने निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Pages