मी लोकांच्या अंतःकरणात आहे आ.भारत भालके.... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, October 16, 2019

मी लोकांच्या अंतःकरणात आहे आ.भारत भालके....


    भालकेच्या सभांना उदंड प्रतिसाद..


पंढरपूर/प्रतिनिधी

      सर्वसामान्यांच्या दूखःत मी नेहमीच शामिल होत असतो. त्यांच्या हाकेला सदैव धावून जात असतो. त्यामुळे लोकांच्या अंतःकरणारत मी बसलो आहे. माझ्या किडण्यांचा विचार तुम्ही करू नका. अगोदर तुमचे रक्त तपासा मी हानुमानाचा भक्त आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे कोणत्याही अफवांना बळी पडू नका अगोदर शहरातील मतपेट्या उघडा मग पूढचा निकाल पहा. ज्यांची तोंड खराब आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप करू नये, असे सांगत फक्त शहरातल्या ड्रेनेजच्या कामातील भ्रष्टाचाराचे उत्तर शिवतिर्थावर द्या असे आवाहन भारत भालके यांनी केले आहे लक्ष्मी टाकळी ता.पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीच्या मित्र पक्षांचे उमेदवार भारत भालके यांनी कॉर्नर सभा घेतली त्या प्रसंगी सरपंच नुतन रसाळे, मेजर मोहन देठे, अ‍ॅड. राजेश भादुले, संदिप मांडवे, सोहम घाडगे, नगरसेवक महादेव भालेराव, महादेव धोत्रे, सुधाकर भोसले, सागर यादव, श्रीकांत शिंदे, समाधान फाटे, मनसेचे शशिकांत पाटील, दिपक येळे, संजय भिंगे आदी उपस्थित होते.
        या वेळी बोलताना भालके म्हणाले की, सन 2011 मध्ये नगरपालिका माझ्या ताब्यात आल्यानंतर शहरामध्ये अनेक विकासकामे केली. परंतू काही जणांनी फोडाफोडीचे राजकारण केले. गोरगरीबांच्या जमिनीवर आरक्षण टाकून स्वतःची संपत्ती काही जणांनी वाढविली. परंतू मी माणसे कमविण्याचे काम केले आहे. शहरातील गुंडा गर्दी व अनेक समस्यांबाबत मी विधानसभेत आवाज उठविला परंतू विरोधकांनी केवळ आप आपसामध्ये भांडणे लावून काट्याने काटा काढण्याचे काम केले आहे शहरामध्ये 1 कोटी झाडे लावण्याचे काम केले असेल तर कुठे झाडे लावली ते दाखवा ? शहरामध्ये मी राष्ट्रीय पुरूषांची अनेक स्मारके उभा केली परंतू सावित्रीला त्रास देणार्‍या मंडळींनी महापुरूषांच्या स्मारकाला जागा सुध्दा दिली नाही ही निवडणूक विधानसभेची आहे. तरीपण यांनी सैनिकांचा अपमान केला तेच माझ्या शरिरावर टिका करीत आहे. परंतू माझ्या किडण्यांचे मी बघतो तुम्ही अगोदर तुमचे रक्त तपासा असे सांगत भारत भालके यांनी शहरात झालेल्या भ्रष्ट कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. या प्रसंगी समाधान फाटे, सागर यादव, संदिप मांडवे, सुमित शिंदे, अ‍ॅड राजेश भादुले आदींनी आपले मनागेत व्यक्त केले. मंगळवेढ्यात 16 प्रचार सभा पार पडल्यानंतर भारत भालके यांनी पंढरपूर शहरामध्ये नागालँड चौक, महावीर नगर, कालिकादेवी चौक, लक्ष्मी टाकळी या भागात कॉर्नर सभा घेतल्या.
       उपनगरामध्ये कोट्यावधींची विकास कामे आ.भारत भालके यांनी केली आहेत न्यायालयीन अडचणीमुळे जेंव्हा टाकळी रस्ता बंद झाला तेंव्हा सर्वात अगोदर आ.भारत भालके धावून आले. नगरपालिकेची बिल्डिींग 2 कोटी 24 लाखाला अर्बन बँकेकडे गहाण ठेवून घेणार्‍यांना विकास कुठे व कोणत्या कोणत्या भागात झाला आहे हे मी पुराव्यासहित सांगू शकतो:- संदिप मांडवे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँगे्रस    

Pages