जागर स्त्री शक्ती चा,गरबा,खेळपैठणी, प्रश्न मंजुषा,गुणदर्शन व स्त्री शक्ती कार्यक्रम उत्साहात.. - Divyaprabhat News

Breaking News

Friday, October 4, 2019

जागर स्त्री शक्ती चा,गरबा,खेळपैठणी, प्रश्न मंजुषा,गुणदर्शन व स्त्री शक्ती कार्यक्रम उत्साहात..


मंगळवेढा/प्रतिनिधी
          नागणे सोशल सर्व्हिसेस चे वतीने नवरात्र महोत्सव निमित्ताने नागणेवाडी,मंगळवेढा येथे सुरू असलेल्या गरबा व दांडिया खेळ पैठणी, विविध कला गुणदर्शन, प्रश्न मंजुषा चा तिसर्या  दिवशी मंगळवेढ्यातील महिलांची आंतरीक व बौद्धिक शक्ती मोठ्या प्रमाणात दिसून आली.महिलांच्या दैनंदिन मिळवणारा उस्फूर्त प्रतिसाद व नवनवीन संकल्पना यामुळे नागणेवाडीतील कार्यक्रम रंगतदार होत आहे आज तिसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर प्रीती शिर्के यांच्या हस्ते व सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्ष सौ अनिता विनायक नागणे यांच्या उपस्थितीत झाल
          आजच्या पैठणीचा खेळात १२५ पेक्षा जास्त महिलांनी भाग घेतला त्यात किरण तेली पैठणी, भरती धनवे सोन्याची नथ रंजना यादव लेडीज घड्याळ वनश्री लंगडे बॉलसेट अनिता बाबर साडी अशी बक्षिसे देऊन गौरवण्यात आले,तसेच प्रश्न मंजुषा कविता शिंदे, कविता भुसे दीपाली जाधव सुलभा नागणे जैतून शेख धोंडाबाई सावंत यांनाही बक्षिसे देऊन गौरवण्यात आले डांस स्पर्धेत सुजाता कोंडूभेरी व ईश्वरी कोंडूभेरी यांना मिक्सर हे बक्षीस मिळाले, गरबा-दांडियाच्या प्रशिक्षणासाठी पुण्याहून स्मिता सोनटक्के, सायन तडवी, मनीषा यादव, या उत्कृष्ट डान्सर चारशे ते पाचशे महिलांना प्रशिक्षण देत आहेत, तरी सदर कार्यक्रमास मंगळवेढ्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून प्रशिक्षण सोबत बक्षिसांची लयलूट करावी असे नागणे सोशल सर्विस  प्रमुख ॲड.विनायक नागणे यांनी केले.

Pages