पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र स्थापन करण्यास मान्यता - सहकार मंत्री सुभाष देशमुख - Divyaprabhat News

Breaking News

Monday, September 9, 2019

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र स्थापन करण्यास मान्यता - सहकार मंत्री सुभाष देशमुखसोलापूर/प्रतिनिधी

महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर त्यांच्या विचारांच्या मुल्यांवर आधारित संशोधन व्हावे, यासाठी पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळानी मान्यता दिली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
श्री. देशमुख म्हणाले की, या अध्यासन केंद्रासाठी विद्यापीठास आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी आवश्यक असलेली पदभरती ही लवकरच करण्यात येईल. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने हे अध्यासन सुरू करावे अशी सातत्याने मागणी करण्यात येत होती. याचा सकारात्मक विचार करून सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.
        महात्मा बसेवश्वर यांनी  समाजातील गरिबी, विषमता दूर करून  आर्थिक समृध्दता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायकवे कौलास” आणि  “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या. माहात्मा बसवेश्वर यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे विचार,  प्रासंगिकता यावर संशोधन व्हावे, त्यांच्या विचारांची  माहिती आजच्या  तरुण पिढी व्हावी यासाठी  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र स्थापन करण्यात येत आहे असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.

Pages