आ.भारत भालके यांच्या निर्णयाकडे इच्छुकांसह जनतेचे लक्ष.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, September 8, 2019

आ.भारत भालके यांच्या निर्णयाकडे इच्छुकांसह जनतेचे लक्ष..



मंगळवेढा/प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेची घोषणा येत्या आठ दहा दिवसांत लागण्याची शक्यता असून काँग्रेसचे विद्यमान आ.भारत भालके यांनी अद्याप आपला पक्ष ठरविला नाही निवडणुकीतील पक्षीय भूमिकेबाबत  विचारविनिमय करण्यासाठी  दि 11 रोजी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मंगळवेढा येत बोलविला असून यासाठी मोठे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे यावेळी आ.भारत भालके   'हातात' 'कमळ'घेतात की 'घड्याळात' बघून 'बाण'मारतात याकडे इच्छुकासह जनतेचे लक्ष लागून राहिले असून त्यांच्या निर्णयावरच मतदार संघातील राजकारणाची दिशा ठरणार आहे
येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार असून त्या दृष्टीने मतदार संघातील इच्छुकांनी जनतेबरोबरचा संवाद वाढविला आहे तर काही जण वरिष्ठ नेतेमंडलीच्या समपर्कात आहेत सध्या पंढरपूर मतदार संघातून विद्यमान आ भारत भालके ,आ प्रशांत परिचारक,समाधान आवताडे,शिवाजीराव कांळुगे,शैला गोडसे यांनी जनसंवाद वाढवून निवडणुकीची तयारी चालवली आहे परतु पक्षीय पातळीवर कोणाचेही तिकीट अद्याप फिक्स नसले तरी काहीजण तिकीट फिक्स असंल्याचे समजून प्रचार करीत आहेत  आ.भारत भालके यांची ही तिसरी टर्म असून ते हॅट्ट्रिक करण्यासाठी जोमाने तयारीला लागले आहेत सध्या ते काँग्रेसचे आमदार असले तरी काँग्रेस पक्षाकडून त्यांची वारंवार अडवणूक होत असून लोकसभा निवडणुकीत मतदार संघातून 7 हजाराचे मताधिक्य काँग्रेसला देऊनही जिल्ह्यातीळ वरिष्ठ नेत्याकडून त्यांना अंतर्गत होत असलेला विरोध पाहता काँग्रेस कडून ते लढणार नसल्याचे स्पस्ट चित्र आहे  त्यांच्याबाबत होत असलेल्या कुरघोड्या मुळे व मतदार संघाच्या विकासासाठी इतर पक्षात जाण्याची शक्यता असून त्यांच्या समर्थकामधूनही पक्षबदलासाठी त्यांच्या वर दबाव आणला जात आहे परन्तु त्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांसह इतर इंंच्छुक उमेदवारांची धकधक वाढली आहे  आ.प्रशांत परीचारकांनी नुकताच युटोपिएन कारखान्यावर आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन व आ.भालके यांचे समर्थक राहुल शहा यांना आपल्याकडे वळविले व आमचे निवडणुकीसाठी ठरल्याचे सांगत दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच  निवडणुकीत आपला उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत प्रा.शिवाजीराव कांळुगे यांनी ही काँग्रेसचे तिकीट मिळाले तर योग्यच नाही तर अपक्ष लढण्याचा चंग बांधला आहे , शैला गोडसे  जलसंधारणमंत्री तानाजी सांवत यांच्या जीवावर शिवसेनेतून  आपण कोणत्याही परिस्थिती उभारणार असल्याचे सांगत प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरू केली तर समाधान आवताडे यांनी संध्या अपक्ष म्हणत ऐनवेळेच्या संधी वर डोळा ठेवून गाव दौरे सुरू केले आहेत आ.भारत भालके यांनी आपला पक्ष हा जनता असून जनता सांगेल त्या पक्षातून उभारणार असल्याचे सांगत सर्व निर्णय आपल्या समर्थकावर सोपविला असला तरी 11 सप्टेंबर रोजी मंगळवेढा येथे त्यांनी आपल्या  समर्थकांबरोबर विचारविनिमय करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यात ते कोणता निर्णय घेतात याकडे समर्थकांसह इच्छुकांचे लक्ष लागून राहीले आहे व कोणत्या पक्षात जातात त्यावर इतर इच्छुकांचे निर्णय अवलंबून राहणार आहेतछ

Pages