शासकिय जागेवर अतिक्रमण व ग्रामपंचायत गाळ्याची तोडफोड प्रकरण..
मंगळवेढा/प्रतिनिधी
पाटकळ ता मंगळवेढा येथील ग्रामपंचायत सदस्या शोभा धर्मराज मोरे यांचे पती धर्मराज मोरे यांचा व्यापारी संकुल येथे गाळा नंबर 19 असून त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गाळ्याच्या पाठीमागील भिंत फोडुन गावठाण जागेवर अतिक्रमण केले आहे तरी सदर अतिक्रमण व ग्रामपंचायतीच्या गाळ्याची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना सदस्य पदावरून निलंबित करण्यात यावी अशी मागणी उर्मिला कोळेकर यांनी या मागणी साठी मंगळवेढा पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु केले आहे सदस्या शोभा धर्मराज मोरे यांचे पती धर्मराज मोरे यांनी पाटकळ येथील व्यापारी संकुल गाळा नंबर 19 मध्ये दुकान असून त्यांनी ग्रामपंचायतला न सांगता व ग्रामपंचायत कोणतीही परवानगी न घेता गाळ्याच्या पाठीमागील भिंत पाडून बेकायदेशीर रित्या गावठाण जागेवर अतिक्रमण केले आहे त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनी त्यांच्या पत्नीचा सदस्य पदाचा दुरुपयोग करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांची सदस्यपद रद्द करण्यात यावी अशा प्रकारची लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा तहसीलदार मंगळवेढा गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनाची दखल घेऊन मंगळवेढ्याची गटविकास अधिकारी यांनी याबाबतचा खुलासा करण्यात यावा तात्काळ माहिती पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करण्यात यावी असा लेखी आदेश ग्रामपंचायत पाटखळ ग्रामसेवक यांना देण्यात आला आहे पण अद्याप काही कारवाई करण्यात आली नाही म्हणून मंगळवेढा पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे
Wednesday, September 11, 2019

Home
मंगळवेढा विशेष
पाटकळ येथील शोभा मोरे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्याची मागणीसाठी उपोषण सुरू ..