आता माघार नाही’ सुधाकरपंत परिचारकांनी थोपटले विधानसभा निवडणुकीसाठी दंड.... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, September 22, 2019

आता माघार नाही’ सुधाकरपंत परिचारकांनी थोपटले विधानसभा निवडणुकीसाठी दंड....


विधानसभा निवडणुक २०१९

पंढरपुर/प्रतिनिधी

     विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याविषयी मौन बाळगून असलेले माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी आज कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असे सांगत ‘आता माघार नाही’ असे स्पष्ट केले सध्या सुधाकर परिचारक हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रयत्नशील आहेत. परंतु भाजप पक्षाने अद्याप त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला नाही. भाजपाने तिकीट दिले नाही तरी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आपण अपक्ष ही लढण्यास तयार असल्याचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी जाहीर केले. पंढरपूर येथील टीळक स्मारक येथे पांडुरंग परिवाराची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये परिचारक कुटुंबातील कोणीही विधानसभा लढवावी अशी मागणी करण्यात आली भाजपाचे तिकीट जरी मिळाले नाही तरी निवडणूक लढविण्याचा आग्रह कार्यकर्ते, पदाधिकारी, नगराध्यक्ष यांनी केला आहे. यावेळी लोकांच्या भावना तीव्र होत्या.तसेच पांडुरंग परिवाराचे नेते व पदाधिकारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जाणार आहेत असे कार्यकर्त्यांमधून सांगण्यात आले.
     या लोकांचा कौल व भावना जपण्याची माझी जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारच आहेअशी देखील माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी ठणकावून सांगितले परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक हे भाजपच्या पाठिंब्याने विधानपरिषद सदस्य झालेले आहेत. त्यामुळे आता स्वतः सुधाकर परिचारक या वयात निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

Pages