सिद्धनाथ विद्यामंदिर पाटखळ प्रशालेचे कबड्डी स्पर्धेत यश.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, September 22, 2019

सिद्धनाथ विद्यामंदिर पाटखळ प्रशालेचे कबड्डी स्पर्धेत यश..पाठकळ/प्रतिनिधी

पाठकळ ता मंगळवेढा येथील शारदा सिद्धनाथ विद्यामंदिर या प्रशालेत शिकणा-या 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थांनी तालुका क्रीडा संकुल इंग्लिश स्कुल मंगळवेढा येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे या कबड्डी स्पर्धेत शंकर आवताडे,आकाश ताड,रोहन काटकर,शुभम भोसले,काशिनाथ हाके,संतोष माने,यश जगधने,अमोल डांगे,दत्तात्रय गडदे,किर्तिराज निंबाळकर,अमन इनामदार,विनायक ऊन्हाळे या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले कौशल्य दाखवुन प्रथम क्रमांक प्राप्त केला.
       या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेली असुन या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापक सुभाष मोटे, सतिश कदम,लक्ष्मण वाघमोडे,शिवाजी आवताडे,तानाजी सोलनकर,अजय निंबाळकर सह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी स्वागत केले.

Pages