राजे रामराव महाविद्यालयात जागतिक स्मृतिभ्रंश दिन साजरा.... - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, September 21, 2019

राजे रामराव महाविद्यालयात जागतिक स्मृतिभ्रंश दिन साजरा....

राजे रामराव महाविद्यालयात जागतिक स्मृतिभ्रंश दिन साजरा....


जत/प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जत येथील राजे रामराव महाविद्यालमध्ये जागतिक स्मृतिभ्रंश दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  महाविद्यालयात जत तालुक्यातील जेष्ठ नागरिकांचे प्रश्न, समस्या समजून घेतल्या व त्यांना मदत व उपाययोजना करण्याकरिता महाराष्ट्र विद्यापीठ सार्वजनिक कायदा 2016 नुसार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान व बैठकीचे आयोजन  करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी सर्व जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने  जतमधील जेष्ठ शिक्षणतज्ञ, विचारवंत व माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, " जेष्ठ नागरिक अनेक शारीरिक , आर्थिक, मानसिक व भावनिक समस्यांचा सामना करत असतात. राज्य व केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांना पेन्शन, मोफत वैद्यकीय उपचार तसेच त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक गावात जेष्ठ नागरिक उद्यान व वनराई उभी केली पाहिजे". आपले विचार व्यक्त करताना जत तालुका जेष्ठ नागरिक संघटनेचे तालुकाअध्यक्ष यशवंतराव चव्हाण म्हणाले कि,   "जेष्टांना म्हातारपणी एकाकीपणा, चिडचिड व अनेक मानसिक व शारीरिक ताण तणावाला सामोरे जावे लागते. कधीकधी त्यांना स्मृतीभ्रंश  यासारख्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी महाविद्यालय आमचे दुःख व समस्या जाणून घेत आदर्शवादी काम करत आहे. आज राजे रामराव महाविद्यालयाने आम्हा जेष्ठ नागरिकांना बोलवून विचार व्यक्त करण्याची संधी दिली व सन्मान केल्यामुळे खरोखर आमचे मन भारावून गेले आहे. अशाच पद्धतीने महाविद्यालय भविष्यातही जेष्ठ नागरिकासांठी कार्यरत रहावे" अशा सदिच्छा व्यक्त केल्या. 
        या कार्यक्रमाला जत हायस्कूल जतचे माजी प्राचार्य डॉ श्रीपाद जोशी, श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्यूनियर काँलेजचे माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस, देवनाळ येथील जेष्ठ नागरिक अण्णासाहेब काटकर, जेष्ठ नागरिक संघटनेचे सर्व तालुका सदस्य, प्रा चंद्रशेन मानेपाटील, प्रा श्रीमंत ठोंबरे, प्रा आर डी करांडे, प्रा सागर सन्नके, प्रा एच टी टोंगारे विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा डॉ बी एम डहाळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  स्वयंसेवक विकास गावडे यांनी केले तर प्रा डॉ व्ही एस जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Pages