ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर राहणार -नूतन कार्यकारी अभियंता :- संजय गवळी - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, September 7, 2019

ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर राहणार -नूतन कार्यकारी अभियंता :- संजय गवळी


नूतन कार्यकारी अभियंता गवळी यांनी पदभार स्वीकारला

मंगळवेढा/प्रतिनिधी

पंढरपूर विभागातील वीज ग्राहकांना चांगली सेवा  देऊन महावितरणच्या वाढत्या थकबाकीला आळा घालण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे पंढरपूरचे नूतन कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी सांगितले येथील कार्यकारी अभियंता नारायण व्हनमाणे सेवानिवृत्त झाल्याने गेल्या तीन चार महिन्यापासून येथील कार्यकारी अभियंता पदाचा पदभार अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांच्याकडे होता त्यांनी आषाढी वारी, पूर परिस्थतीत महावितरण ची यंत्रणा उत्कृष्टपणे सांभाळली आहे  येथील रिक्त जागी कणकवली येथे कार्यरत असणारे संजय गवळी हे येथील विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे यावेळी त्यांचा अतिरीक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार सोनंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला  यावेळी  नूतन कार्यकारी अभियंता गवळी यांनी सर्व अधिकाऱयांची बैठक घेऊन विविध सूचना देत ग्राहकांना चांगली सेवा देऊन वसुलीचे उद्दिष्ट देखील वेळेवर पूर्ण करण्याविषयी सांगितले यावेळी उपकार्यकारी अभियंता रवींद्र भुतडा,हेमंत कासार ,संजय शिंदे,आनंद पवार, पी आर शिंदे,  व्यवस्थापक दीपक भोसले,चैतन्य कदम, सुहास शेंडगे ,लेखापरीक्षक अधटराव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते
पंढरपूर विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता संजय गवळी यांचा अतिरीक्त कार्यकारी नंदकुमार सोनंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी ठेकेदार संघटनेच्या वतीनेदेखील सत्कार करण्यात आला यावेळी सतीश ताड, टी जी बनसोडे,उल्हास पाटील,संतोष पवार,दादासो इंगळे,संभाजी नागणे,अनिल दिघे,विजय मिसाळ  विजय वाघ,आदी उपस्थित होते

Pages