शिक्षक दिनानिमित्त 'गुरुवंदन' भारत विकास परिषदेचा अनोखा उपक्रम - Divyaprabhat News

Breaking News

Friday, September 6, 2019

शिक्षक दिनानिमित्त 'गुरुवंदन' भारत विकास परिषदेचा अनोखा उपक्रम

पंढरपूर/प्रतिनिधी

शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारत विकास परिषद पंढरपूर शाखेच्या वतीने ‘गुरूवंदन’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत आदर्श प्राथमिक विद्यालय, महिला मंडळ प्राथमिक शाळा, विवेक वर्धिनी विद्यालय, लोकमान्य विद्यालय व यशवंत विद्यालयातील गुणवंत शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला यामध्ये आदर्श प्राथमिकच्या मैत्रेयी केसकर, राजश्री घंटी, महिला मंडळ शाळेतील जयश्री भागवत, माधुरी यारगट्टीकर, विवेक वर्धिनी विद्यालयातील रुपाली भुसे, प्रेम खेडकर, महादेव रणदिवे, लोकमान्य विद्यालयातील आनंदराव ओंबासे, दीपक इरकल, यशवंत विद्यालयातील आझाद काझी, भाऊसाहेब भालके यांचा शिल्प, आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच विवेकानंदांची प्रतिमा असलेले भारत विकास परिषदेचे सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन भाविपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुेरंद्र काणे,  स्मीता कोर्टीकर, मंदार लोहोकरे, मेधा दाते, डॉ. वर्षा पाटील, वसुधा काणे, डॉ. अनिल पवार, सुनील उंबरे, सचिन बेणारे, सुनील परळीकर, पी. एस. कुलकर्णी, डॉ. वर्षा काणे, डॉ. मृणाल गांधी, डॉ. राजेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
    यावेळी माजी आ. सुधाकरपंत परिचारक, मुख्याधिकारी अनिकेत मानुरकर, उपक्रम प्रमुख मंदार केसकर, मोनिका शहा, स्वानंदी काणे यांच्यासह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Pages