अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, September 24, 2019

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न....




 पंढरपूर/प्रतिनिधी

          अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,माथाडी कामगारांचे आराध्य दैवत,थोर मराठा कै आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या 86 व्या जयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ व सिंहगर्जना ग्रुप,पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेचे उदघाटन सौ जयश्रीताई भारत भालके,सौ प्रणितीताई भगिरथ भालके यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती मा.श्री.डाॅ सागर कवडे(DYSPपंढरपूर) ,सौ साधनाताई भोसले(नगराध्यक्षा नगरपरिषद पंढरपूर),सौ स्मिताताई भोसले,कु श्रेया भोसले,मराठा महासंघाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष मा संतोष जाधव, शहराध्यक्ष मा अमोल पवार, शहर संघटक मा काका यादव,रिक्षा संघटना शहराध्यक्ष मा नागेश गायकवाड, वि.आघाडी तालुकाध्यक्ष मा प्रणव गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मा जिवन गायकवाड, पांडुरंग शिंदे,सुधीर थिटे,हर्षद मोरे, प्रविन व्यवहारे,दिपक थिटे,नागेश कोरके,युवराज क्षीरसागर, देवकते सर,बडवे सर,रणदिवे सर, भोसले सर, यांच्यासह विविध मांन्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाले.                यावेळी सागर कवडे साहेब मार्गदर्षन करताना म्हणाले आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त हिजी स्पर्धा भरवलेली आहे ती खरंच एक चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे.या स्पर्धेतून खेळाडू मुलांच्या गुणांना एक वाव,एक प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहोत, यातूनच काही स्पर्धक राज्यस्तरावर,देशापातळीवर जाओ व जातील अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त केल्या.अर्जुनराव चव्हाण मार्गदर्षन व्यक्त करताना म्हणाले आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त बुद्धिबळ स्पर्धेबरोबर आम्ही मराठा महासंघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत.आण्णासाहेबांनी आपले आयुष्य समाजहितासाठी,माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी,समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी समर्पित केले.आण्णासाहेबांचे विचार आपण समाज बांधवांनी आत्मसात करून प्रेरणा घेण्याची गरज आहे,तसेच मराठा समाजातील उद्योजक युवकांनी,युवतींनी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे कोणाला अडचण आल्यास मराठा महासंघाच्या वतीने त्यांना सहकार्य करू,एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे मनोगत व्यक्त केले.स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली यावेळी स्पर्धक, शिक्षक, मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Pages