आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन.. - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, September 24, 2019

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन..





 पंढरपुर/प्रतिनिधी 

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे असून,आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन निडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील विविध राजकीय प्रतिनिधीं समवेत आदर्श आचार संहितेचे पालन व निवडणूक विषयी महत्वाच्या सूचनांबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे, निवडणूक नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी ढोले बोलताना म्हणाले, आदर्श आचार संहितेचे  उल्लंघन होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेवून आचार संहितेचे पालन करावे. राजकीय पक्षांनी सभांसाठी आवश्यक परवानग्या संबंधित यंत्रणेकडून घ्याव्यात. प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या नियमांची अंमलबजावणी केली जावी. प्रसारमाध्यमाव्दारे राजकीय जाहिरात करण्यापूर्वी ती जाहिरात समितीकडून प्रमाणिकरण करुन घ्यावी. माहिती पुस्तीका मुद्रण करताना त्यावर प्रकाशक व संख्या याची माहिती प्रकाशित करावी. आदर्श आचार संहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी-व्हीजल ॲपचा वापर केला जाणार आहे. प्रचारावर होणाऱ्या विविध खर्चाचे विवरण वेळेत सादर करावे.  असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी केले.
यावेळी मतदारांसाठी असलेल्या सोयी सुविधा, मतदार याद्या, नामनिर्देश पत्र,  उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाबाबत सूचना आदीबाबत सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीत दिलीनिवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करुन हि निवडणूक सर्वांनी एकत्रित शांततेत व भयमुक्त वातावराणात पार पाडण्याचे आवाहनही  निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी केले. 


Pages