भूसंपादनाचे पैसे मागण्यासाठी जाणाऱ्या बाधित शेतकऱयांना प्रांताधिकारी भोसले यांच्याकडून होतेय दमबाजी.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, September 5, 2019

भूसंपादनाचे पैसे मागण्यासाठी जाणाऱ्या बाधित शेतकऱयांना प्रांताधिकारी भोसले यांच्याकडून होतेय दमबाजी.. मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील सुरू असलेल्या रत्नागिरी नागपूर या महामार्गासाठी संपादित जमिनीचा मोबदला मागणाऱ्या  शेतकर्‍यांना येथील प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्याकडून  दमबाजीची भाषा वापरली जात असून होत रस्त्याचे काम बंद पाडल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून अजामीनपात्र कलमे लावण्याची  भाषा वापरली जात असल्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तसेच जमिनीच्या भूसंपादनाचा मोबदला देऊनच काम करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे   सध्या मंगळवेढा तालुक्यात रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे  तत्कालीन प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे फाईली त्वरित मार्गी लावू अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला तत्काळ मिळवून दिला होता त्यामुळे या महामार्गाचे काम मंगळवेढा व  सांगोला तालुक्यात वेगाने सुरू झाले सध्या भुसमापादनाचे केंद्र शासनाकडून 600 कोटींची रक्कम मंगळवेढा प्रांत कार्यालयाकडे पडून असतानाही शेतकऱयांना काही किरकोळ गोष्टींमुळे भुसमापादनाची रक्कम मिळेना झाली आहे गायकवाड यांच्या  जागी नव्याने आलेले प्रांताधिकारी भोसले यांच्या गेल्या चार पाच महिन्याच्या कालावधीत येथील अनेक शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे पैसे शिल्लक असून देखील शेतकऱ्यांना मिळेनासे झाले आहेत भूसंपादनाचे पैसे येणार या आशेपोटी बाधित शेतकऱ्यांनी वेगवेगळे नियोजन केलेले असताना हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने  पैशाअभावी सर्व नियोजन कोलमडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाई जाणवू लागली आहे येथील काही शेतकऱ्यांच्या सातबारा गटावर गेल्या 50 ते60  वर्षात कोणत्याही व्यक्तीचा काहीही सम्बध,नामोल्लेख नसताना काझी नामक व्यक्तीच्या तक्रारिवरुन  शेतकऱयांचे पैसे थांबवले आहेत  तसेच काही शेतकऱयांनी नोव्हेंबर,डिसेंम्बर18 मध्ये फायली देऊनही अद्याप ही त्यांना मोबदला मिळाला नाही त्यामुळे येथील काही शेतकऱ्यांकडून भूसंपादनाचे पैसे न मिळाल्याने रस्त्याचे  थांबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज दि 3 रोजी मंगळवेढा प्रांत कार्यालयात अंधळगाव येथील शेतकऱयांना बोलावून काम थांबवू नका तुमचे पैसे दमा दमाने मिळतील काम अडवल्यास पोलिसाकरवी कारवाई करून अजामीनपात्र कलमे लावली जातील मग तुमचे नातेवाईक  महिनाभर हेलपाटे मारतील इतर कामे बघत तुमचे भूसंपादन पैसे देण्याच्या  फायली बघण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने वेळ मिळेल तशा फायली मार्गी लावू असे सांगितले 
तसेच बाधित शेतकऱयांच्या अनेक फायली प्रलंबित असून अनेक शेतकऱयांना प्रांतांच्या दमबाजीची प्रचिती आली असून जमिनी गेल्या शेतकऱयांच्या मात्र रुबाब अधिकाऱयांचा अशी अवस्था झाली आहे  याबाबत प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्याशी भ्रमणध्वनि वरून सम्पर्क साधण्याचा पाच ते सहा वेळा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही

Pages