सर्वज्ञ डांगे या विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, September 6, 2019

सर्वज्ञ डांगे या विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप...
सागोला/प्रतिनिधी

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून व सर्वज्ञ सौदागर डांगे या विद्यार्थिनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
सर्वज्ञ डांगे या विद्यार्थीनीचे उच्चशिक्षित पालक सौदागर डांगे व वनिता डांगे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जोपासत शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप व खाऊ वाटप करून एक आदर्शवत असा वाढदिवस साजरा केला.याबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
       यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे,बोञे सर,स्वामी मॅडम यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी- शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करताना सौदागर डांगे,वनिता डांगे,मुख्याध्यापिका सरिता कापसे व इतर...

Pages