आरोग्य हीच खरी संपत्ती :- राजन पाटील.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, September 26, 2019

आरोग्य हीच खरी संपत्ती :- राजन पाटील..


पंढरपूर/प्रतिनिधी

सध्या आयुष्य हे धकाधकीचे झाले असून त्यातून अनेक आरोग्याच्या समस्या समोर येत आहेत. याच गोष्टीकडे लक्ष वेधून डॉ अमरजीत गोडसे व शरद गोडसे यांनी सुरू केलेल्या या रॉयल टच व रेडीमेड फर्मच्या उद्घाटनप्रसंगी घेतलेला अस्थिरोग तपासणी शिबीराचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.
        पंढरपूर येथील डॉ अमरजीत पाटील व शरद गोडसे यांनी सुरू केलेल्या रॉयल टच व रेडीमेड फर्मचे उद्घाटन माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते व सुभाष भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण मिस इंडिया आयएफएफ च्या विजेत्या धनश्री गोडसे या होत्या. तर यावेळी उद्योगपती अभिजीत पाटील, राष्ट्रवादीच्या निर्मला बावीकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, गणेश अधटराव, प्रदीप जगदाळे,प्रवीण पाटील, सरपंच गणेश पाटील,  प्रतापराव गोडसे, आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मॅट्रिक्स जर्मन टेक्नॉलॉजी द्वारे अस्थिरोग तपासणी शिबीरात सुमारे 350 गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी मुंबईचे डॉ देशपांडे व टीमने विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार डॉ अमरजीत गोडसे व शरद गोडसे यांनी मानले.   

Pages