राजे रामराव महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाने दिली लकडे पेढे लघुउद्योगाला भेट.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, September 25, 2019

राजे रामराव महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाने दिली लकडे पेढे लघुउद्योगाला भेट..


जत/प्रतिनिधी

      राजे रामराव महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आज वाळेखिंडी ता. जत येथील प्रसिद्ध लकडे पेढे या लघुउद्योग समूहाला भेट देऊन यासंदर्भात माहिती घेतली.  जत शहरापासून उत्तरेला सुमारे 25 कि.  मी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध अशा वाळेखिंडी येथील लकडे पेढे हा यशस्वी उद्योग असून याचा अभ्यास व अनुभव घेण्यासाठी आज महाविद्यालयाच्या चोवीस विद्यार्थ्यांनी व चार प्राध्यापकांनी भेट दिली.  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जत व जतपरिसरातील उद्योग व उद्योगपती यांची ओळख निर्माण व्हावी हा या भेटीमागचा हेतु होता. यावेळी बोलताना लकडे उद्योग समुहाचे प्रमुख शिवाजी लकडे म्हणाले, "लकडे पेढे हे जत आणि जतपरिसरात अतिशय प्रसिद्ध बेकरी उत्पादन असुन जवळपास 50 वर्षाची परंपरा या उद्योगाला आहे.  आमच्या तिन पिढ्यांपासून पेढे बनवले जातात. जतपरिसरात याला खूप मागणी आहे". या भेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा डॉ एस जी गावडे यांनी केले. याप्रसंगी प्रा ए एच बोगुलवार,प्रा डी बी रणदिवे व प्रा आर डी सांवत उपस्थित होते.

Pages