भुमिपुत्राची विधानसभेची वाट आव्हानात्मक ... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, September 15, 2019

भुमिपुत्राची विधानसभेची वाट आव्हानात्मक ...

मंगळवेढा/प्रतिनिधी

गत विधानसभेचे शिवसेनेचे पराभूत उमेदवार समाधान आवताडे यांनी संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर आसवनी प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रमात राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे चुलते बबनराव आवताडे यांच्यासह सात संचालक गैरहजर राहिल्याने मंगळवेढा तालुक्यात आवताडे यांच्या राजकीय भवितव्याच्या कार्यक्रमाला अडचणीचा डोंगर पार करावा लागणार असे बोलले जात आहे
अशाताच शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार पासून संत दामाजी व फेबटेक साखर कारखानाच्या थकित बिलासाठी उपोषण करण्यात येणार असल्याने निवडणुकीच्या काळात आव्हानात्मक चित्र निर्माण झाले आहे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मंगळवेढ्यातील भूमिपुत्र या आशयानुसार जोरदार प्रचार करत समाधान आवताडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली यावेळी त्यांचे चुलते बबनराव अवताडे यांनी 25 वर्षांच्या राजकीय अनुभवाला उपयोगात आणून विविध कार्यकारी सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ कृषी उद्योग संघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने समाधान आवताडे यांना तालुक्यातून  भरभक्कम पाठिंबा उभा केला होता. त्यानंतरही समाधान आवताडे यांचा विजयी वारू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरु होता संत दामाजी साखर कारखाना पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळाले या यशात बबनराव आवताडे यांचा सिंहाचा वाटा होता मात्र मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहील्याने आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. बबनराव अवताडे यांनी कारखान्याच्या कार्यक्रमाला टाळण्याची ही पहिली वेळ नाही. पूर्वीच्या काही कार्यक्रमात सात संचालक गैरहजर राहिले आहेत. बबनराव आवताडे यांच्याकडे सहकार क्षेत्र एक हाती असल्याने त्यांचे राजकीय वजन तालुक्यात दुर्लक्ष करण्यासारखे नाही.येत्या चार दिवसात ते मेळावा घेणार असुन त्यांची भूमिका स्पष्ट करतील असे समजत आहे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने तालुक्यातील मतदारांमध्ये या कार्यक्रमातील घडलेल्या घटनांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अविनाश महागावकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी सांगताना भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारास संधी मिळते मात्र यासाठी मला 23 वर्षे वाट पाहावी लागली तुम्ही तेवीस वर्ष थांबणार आहात का असा प्रश्न करत समाधान आवताडे यांच्याकडे पाहिले असल्याने महायुतीकडून भाजपच्या वाट्याला मतदार संघातील जागा गेल्यास समाधान आवताडे यांना संधी मिळणार नसल्याचे अप्रत्यक्ष सूतोवाच केले असल्याची चर्चा तालुक्यातील राजकीय जाणकारातून होत आहे. या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे संजय मामा शिंदे हे या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याची चर्चा देखील सुरू असून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Pages