राष्ट्रीय लोकअदालतीत 57 प्रकरणे निकाली.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, September 14, 2019

राष्ट्रीय लोकअदालतीत 57 प्रकरणे निकाली..



   12 लाख 23 हजार 765 रुपयांवर तडजोड..




पंढरपूर/प्रतिनिधी

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये  दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात दावे यांचे प्रलंबीत 332 प्रकरणे तसेच दाखल पुर्व 878 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 57 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून, या प्रकरणामध्ये एकूण 12 लाख 23 हजार 765 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष्य‍ तथा जिल्हा न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी दिली.
      तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष्‍य तथा जिल्हा न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2019 रोजी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या लोकअदालतीसाठी एकूण तीन पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनल मध्ये जिल्हा न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर, सह. दिवाणी न्यायाधिश एस.जी.सरोदे, सह.दिवाणी न्यायाधीश एम.आर.जाधव यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले
    यावेळी  विधिज्ञ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवान मुळे, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.

Pages