108 रुग्णवाहिकेची सेवा टायर वाचुन बंद .... - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, September 17, 2019

108 रुग्णवाहिकेची सेवा टायर वाचुन बंद ....



मंगळवेढा/प्रतिनिधी

शहर व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदायिनी असलेल्या या रुग्णवाहिकेचा टायर खराब असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयात कडून असल्यामुळे ग्रामीण शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ लागले आहे
       मंगळवेढा,आंधळगाव ,मरवडे सलगर बुद्रुक, बोराळे ,भोसे या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत व उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णाला तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून शासनाने 108 या क्रमांकावर फोन केल्यास रुग्णवाहीका रुग्णापर्यंत येऊन दवाखान्यात उपचारासाठी दाखल करत असून या सुविधेमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील अनेकांचे प्राण वाचलेले आहेत अशा परिस्थितीत नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू झाले आहे तर पंढरपूर ते विजापूर या महामार्गांच्या कामामुळे शहरातील वाहतूक वेगवान झाले आहे शिवाय या रस्त्यावरून दुचाकी भरधाव वेगाने वाहनांची संख्या देखील वाढली आहे शहरातील तोकडी पोलिसांची संख्या विचारात घेता अपघातावर नियंत्रण करणे मुश्कील ठरत आहे अशा परिस्थितीत एखादी अनर्थ घडला तर रुग्णाला रुग्णाला तातडीने उपचारासाठी दाखल करणे गैरसोयीचे होत आहे. त्यामध्ये एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळवेढ्यासाठी असलेली 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सध्या टायर खराब झाल्यामुळे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात बसून आहे त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील व अचानक एखादा प्रसंग घडल्यावर रुग्णाला खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे परंतु खासगी वाहनातून भाड्यापोटी रुग्णाला आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे त्यामुळे ही रुग्णवाहिका तातडीने कार्यान्वित करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

Pages