आमच्या झेंड्याची घाई विरोधकांना झालीय आ. भालके... - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, September 11, 2019

आमच्या झेंड्याची घाई विरोधकांना झालीय आ. भालके...
मंगळवेढा/प्रतिनिधी

           गेल्या दोन महिन्यात एक लाखाहून अधिक मतदार व कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या भालके गटाने आजच्या विचारविनिमय बैठकीनंतरही राजकीय सस्पेन्स कायम ठेवत राजकीय पंडित व विरोधी उमेदवारांनाही कोडयात टाकले. हजारो कार्यकर्त्यांनी आ. भालके हाच आमचा पक्ष असल्याची ग्वाही दिली तर जनता जनार्दन हाच आपला पक्ष असल्याचा आमदार भारत नाना भालके यांनी निर्वाळा दिला.
         मंगळवेढा येथील बायपास रोड नजिकच्या भव्य पटांगणात आ. भालकेप्रेमी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.भालके यांनी मागील दोन निवडणुकात मतदानरुपी आशिर्वाद दिल्याबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करताना दहा वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडला. काही कामे झाल्याचे समाधान असले तरी अनेक अपूर्ण कामांना न्याय देण्यासाठी 2019 च्या निवडणुकीत साथ द्यावी असे आवाहन केले.
       यावेळी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील  अनेक पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून जनतेच्या सुख दुखाःला धावून जाणारा , विधीमंडळात प्रश्नांना वाचा फोडणारा , गोरगरिबांना मदत करणारा , कार्यकर्त्यांची कदर असलेला , सामान्यांना देखील सहज उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी आ. भालके यांच्यारुपाने लाभल्याचे अभिमानपूर्वक सांगताना जनतेच्या ह्रदयसिंहासनावर  राज्य करणारे आ. भारत नाना भालके हाच आमचा पक्ष असून महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहून मतदार संघाच्या विकासासाठी ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल अशी ग्वाही हजारो कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात दिली तर आ. भालके यांनी जनता हाच आपला पक्ष असून तुमची साथ आणि प्रेम आहे तोवर कुठल्याही संकटातून नौका सहज पार करु असा विश्वास व्यक्त केला. आगामी राजकीय  वाटचालीबद्दल ते भाष्य करतील  अशी अपेक्षा असताना आजही या विषयाला बगल देत राजकीय निर्णयाचे अधिकार जनतेच्या साक्षीने व संमतीने स्वतःकडे घेतले. याबद्दल बोलताना त्यांनी अनेक राजकीय पंडीत तर्कवितर्क लढवत आहेत तर काही विरोधक मिडियातून संभ्रम पसरवित आहेत. निर्णयातील विलंब ही मजबूरी नसून राजकीय आखाड्यातील कुशल डावपेच असल्याचे सांगून आपल्या निर्णयाची घाई आपल्या लोकांना नसून विरोधकांना झाल्याचे सांगत अनेकजन सलाईन वरुन व्हेंटीलेटरवर पोहचल्याचे सांगत विरोधकांची खिल्ली उडविली आजच्या या मेळाव्यामध्ये मतदार संघातील सुमारे 30/35 हजार कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आ. भालके यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ असल्याची पुनश्च ग्वाही दिली. गेल्या महिनाभरात आ. भालके यांनी महिला मेळावे , गाववार -- बुथवार बैठका घेऊन निवडणुकीची जय्यत तयारी केली असूनआजच्या विराट मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करीत विजयाच्या हॅटट्रीकसाठी भालके गट  सज्ज असल्याचे दाखवून दिले.

Pages