इनामी जमिनिसदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ-जिल्हाधकारी राजेंद्र भोसले - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 4, 2019

इनामी जमिनिसदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ-जिल्हाधकारी राजेंद्र भोसले




मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा येथील इनामी जमिनिसदर्भात प्रत्येक फाईल बघून सकारात्मक निर्णय घेऊ तसेच जुनी शर्त, व भोगवटदार दोनच्या जमिनी भोगवतदार एक च्या जमिनी समजून मोबदल्याची 10 टक्के रक्कम शासन जमा करून उर्वरित 90 टक्के रक्कम  शेतकऱ्याला दिली जाईल  काझी इनामी जमीन संदर्भात महसूल मंत्र्यानी स्थगिती दिली असून याबाबत आठ दिवसात पुढील कार्यवाही होणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले
सोलापूर सांगोला महामार्गावरील मंगळवेढा तालुक्यातील बाधित शेतकरयांच्या जमिनीच्या मोबदल्याच्या अडीअडचणी संदर्भात आ भारत भालके यांनी जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले यांच्याकडे बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी  जिल्हाधिकारी  भोसले म्हणाले की विविध वतनाच्या ज्या जमिनी आहेत त्या भोगवतदार एक च्या जमिनी असून त्यांना मोबदला द्यावा  ज्यांनी वतनाच्या जमिनीचे पैसे भरले नव्हते त्या
जमिनी भोगवतदार2  असल्याने त्यांचा मोबदला देताना 10 टक्के रक्कम शासन जमा करून उर्वरित रक्कम शेतकऱयांना द्यावी,2हजार एकर जमिनीवर काझी इनाम नाव लागले असून यावर महसूल मंत्र्यानी स्थगिती दिली आहे यावेळी महसूल सचिव यांना जिल्हा धिकार्यांनी फोन लावून अनके शेतकऱयांचा मोबदला अडकला असून याबाबत  तातडीने निर्णय घेन्याची विंनती केली त्यावर आठ दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले तसेच इनामी देवस्थान  जमिनी संदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदार यांनासर्व कागदपत्रे  घेऊन येण्याचे आदेश देत प्रत्येक फायलीचा अभ्यास करून  शेतकऱयांना मोबदला मिळवून देण्यासाठी सकारत्मक निर्णय घेऊ असे सांगितले यावेळी आ भारत भालके यांनी शेतकऱयांनी रीतसर जमिनी खरेदी केलेल्या असताना शेतकऱयांची नावे उडवली आहेत , रीतसर खरेदी व उताऱ्यावर नाव असताना चुकीच्या तक्रारींमुळे पैसे अडवणे , अर्धवट बाधित घरांचे पूर्ण भरपाई देणे, काझी इनाम व देवस्थान जमिनिसदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली भूमिहीन व स्वातंत्र्य सैनिकांना दिलेल्या जमिनी चा मोबदला दयावा  आशा मागण्या यावेळी केल्या  या बैठकीच्या वेळी  उजनी विभाग9 चे कार्यकारी अभियंता नारायण जोशी, तहसीलदार स्वप्नील रावडे, दामोदर माने,नागेश राऊत,शिवाजीराव पवार, बाबा कोंडुभैरी,,राजाराम सूर्यवंशी  विजय बुरकुल, नाना कोंडुभैरी, जगनाथ रेवे,रामू पुजारी,रमीजराजा मुल्ला,रावसाहेब फटे ,दामोदर हेमबाडे, सिद्राम लंगोटे आदी उपस्थित होते चौकट---
इनामी जमिनिसंदर्भात शेतकऱयाना मोबदला देताना सांगली जिल्ह्यातील शेतकऱयांना मोबदला दिला आहे परंतु मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱयांना मोबदला न देता त्यांचे पैसे इनामी जमिनी असल्याने अडकवून ठेवल्याने  वेगळा न्याय कशासाठी असा प्रश्न आ भारत भालके यांनी उपस्थित करीत मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱयांना पटवर्धन संस्थानने  दिलेल्या खाजगी जमिनी असून त्या जमिनिसदर्भात वतन,इनाम धर्मादाय संस्था,वककबोर्ड यांची कोणतीही कागदपत्रे नसताना  दुष्काळी भागातील गोरगरीब शेतकऱयांचे पैसे अडवून ठेवले आहेत  याबाबत मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे हा प्रश्न मांडला असल्याचे

Pages