35 गावच्या मूळ योजनेला बगल देऊन पाणी कमी करून गावे वगळलेली योजना आम्हास नको- नितीन पाटील - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 4, 2019

35 गावच्या मूळ योजनेला बगल देऊन पाणी कमी करून गावे वगळलेली योजना आम्हास नको- नितीन पाटील




मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील 35 गाव योजनेचे आ भारत  भालके हे  निर्माते असून त्यांनी या योजनेसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत   सत्ताधारी असताना एक रुपयाचाही  निधी गेल्या पाच वर्षात न देता  योजनेतील एक टीएमसी पाणी व15 गावे वगळून प्रशासकीय मंजुरीचे  देण्याचे पाप करीत असून दुष्काळामुळे आदिवासी पेक्षाही वाईट  परीस्थिती भोगत असलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळन्याचा प्रकार  जलसंधारण मंत्री तानाजी सावन्त यांनी करू नये अशी टीका  मंगळवेढा पंचायत  समितीचे विरोधी पक्षनेते नितीन पाटील यांनी केली आहे
ते म्हणाले की मंत्री तानाजी सावत हे जबाबदार मंत्री असून ते धडधडीत खोटे बोलत आहेत यांच्याच पक्षाच्या जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी पाठीमागे मंगळवेढ्यात येऊन 35 गाव योजना गंडवागंडवीचे असल्याचे म्हटले होते परन्तु याच योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती  मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागाला पाणी मिळावे यासाठी आ भारत भालके यांनी 2 टी एमसी पाणी व 24 गावासाठी 530 कोटींची योजना मंजूर करून घेतलीआहे परन्तु तुमचे सरकार 1 टीएमसी पाणी व 9 गावासाठी सुधारित योजना बनवून उर्वरित गावावर अन्याय करीत आहे तसेच  तुम्ही सत्ताधारी असूनही गेल्या4 वर्षापासून एक दिमडीही दिली नसताना 35 गाव योजनेबाबत चुकीची माहिती देऊन राजकारण करीत आहात 35 गाव योजना,शिरणांदगी तलावात म्हैसाळचे पाणी येण्यासाठी आ भारत भालके यांनी सातत्याने  विधानसभेत व विधानसभेबाहेर आवाज उठवला आहे आम्हाला पाणी कमी करून व गावे वगळलेली योजना माथी न मारता आमची 2 टी एमसी पाणी व 24 गावे असलेली योजनेस प्रशासकीय मंजुरी देऊन निधी द्या तसेच तुम्ही शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शासनाचे प्रतिनिधी म्हणून पीकविमा, कर्ज माफी,दुष्काळी निधी, विजबिलमाफी  सन्मान योजना निधी याबाबत चक्कार शब्द न काढत केवळ आ भालके यांच्यावर टीका करीत  शेतकरयाची कुचेष्टा केली आहे  आ भालके यांनी तालुक्यात जलसंधारणाच्या कामासाठी अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला असून पाणी फाउंडेशन च्या गावं आमदार निधीतून फंड दिला आहे तसेच दोडा नाला ओढ्याचे रूपांतर नदीत करून निधी मिळविला आहे   आ  भारत भालके यांनी तालुक्यात केलेल्या कामांबाबत जनतेकडून  माहिती घेवुन बोलला असते तर बरे  झाले असते
दीड वर्षापूर्वी आमदारकी मिळवून दोन महिन्यापूर्वी मंत्री झालेले सावंत या योजनेबाबत भारत भालके यांचे  पाण्यासाठीचे प्रयत्न नाकारत आहेत हे हास्यास्पद असून  विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून  जनतेला वेगळ्या पद्धतीने भासवण्याचा प्रयत्न करतआहेत भैरवनाथ शुगर च्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न देता संबंधित शेतकऱ्याला अनेक वेळा आंदोलने करण्याचा मार्ग निवडावा लागला यातच शेतकऱ्यांची हित किती आहे हे समोर येत आहे.  सत्ताधारी असून मंत्री असून तालुक्यातील अनेक गावे व हक्काचे पाणी वगळणार असाल तर त्या भागातील लोकांना आदिवासी भागाप्रमाणे जीवन जगायला लावण्याचा आपला इरादा यातून स्पष्ट होत आहे. तालुक्यात भीषण दुष्काळ पडला असताना आपल्या नियोजनाखाली चालणाऱ्या भैरवनाथ शुगर ने तालुक्याच्या दुष्काळ पूर्तीसाठी किती रुपयाचा निधी दिला पंढरपुरातून पाणी पुढे आले नाही असे म्हणत असताना बोगद्यातून माढा तालुक्याला जाणारे पाणी आपण कोणत्या भावनेने वापरत आहात याबाबत विचार करावा. शेतकऱ्यांच्या मेळाव्यातून शेतकऱ्यांना सत्ताधारी सरकारने कोणता दिलासा दिला याबाबत माहिती देणे अपेक्षित असताना निवडणुका डोक्यात ठेवून तालुक्यातील दुष्काळी जनतेला पुन्हा एकदा फसवण्याचे पाप करत असताना आपण  थोडी तरी सभ्यता दाखवणे आवश्यक होते असा टोला नितीन पाटील यांनी लगावला

Pages