मंगळवेढा पाेलीस ठाण्यत कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात अर्वाच्य भाषेत झाली शिवीगाळ.. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, August 28, 2019

मंगळवेढा पाेलीस ठाण्यत कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात अर्वाच्य भाषेत झाली शिवीगाळ..


दाेन दिवस उलटूनही कुठलीच कारवाई नसल्याने जनतेतून आश्चर्य..


मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा पाेलीस ठाण्यात नशेत तर्र असलेल्या  एका नविन सहाययक फाैजदाराने  गावरान भाषेत  वरिष्ठ आधिकार्याला खालच्या पातळीवर येत शिवीगाळ करन्याचा प्रकार नुकताच घडला असून हा प्रकार  चक्क पाेलीस ठाण्यात घडला असून यावेळी तालुक्याच्या साहेबांचे साहेबाना देखील हा प्रकार पहायला मिळाला . सर्वसामान्य नागरिकांने रस्त्यावर भांडण केले असता तातडीने कारवाई करणारे पोलीस मात्र पोलीस ठाण्यातच एवढा मोठा प्रकार घडून ही  सम्बधितावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे जनतेमधून आशर्य व्यक्त हाेत आहे दरम्यान या घटनेबाबत पोलीस डायरीला केवळ नोंद घेतल्याचे सूत्राकडून समजते
        याबाबत अधिक माहिती अशी की येथील वरिष्ठ अधिकारी व सहायक फाैजदार यांच्यात  गेल्या तीन दिवसापूर्वी भ्रमण ध्वनीवर चेष्टेत बाेलने चालू हाेते.  मुळात दारूच्या नशेत तर्र असलेल्या त्याकनिष्ठ आधिकारयाला त्या बोलण्यातील काही भाग खटकळला अन त्याची सटकली त्यावेळी त्या कनिष्ठ अधिकाऱ्याने कशाचेही भान न ठेवता आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला अत्यन्त खालच्या पातळीवर शिवीगाळ चालू केली रकनिष्ठ आधिकारी तर्र आसल्यामुऴे आपन वरिष्ठाना शिवीगाळ करताेय याचे भानच राहीले नाही.भांडन विकाेपाला गेल्याने हानामारीचा प्रकार घ़डताेय की काय अशी शंका हाेती. डी.वाय. एस.पीं.ना. पाेलीस ठाण्यात बाेलवावे लागले.माेबाईल मधील शिवीगाळ रेकार्ड चेक करण्यात आले. व त्या कनिष्ठ अधिकाऱ्याला डी वाय एस पी नी झापल्यानंतर त्याची उतरली पाेलीस खात्यात शिस्तीला आधिक म्हत्व आहे.नागरीकांनी माेठ्याने ओरडल्यावर शांततेचा भंग केल्याची कारवाई केली जाते.येथे कायद्याच रक्षण करणार्यानी पाेलीस स्टेशन डाेक्यावर घेतल तरी कुठलीच कारवाई नाही.मेडीकल करन्याची चर्चा झाली तीही केली गेली नाही. चक्क पोलीस ठाण्यात ऐवढा माेठा गाेंधळ घालुनही कोणताच गून्हा नाेदवला नाही. कायदा सर्वाना समान असताना  येथील पोलीस ठाणे  मात्र कारवाईबाबत दूजाभाव  करीत असल्याचे दिसून आले . ही सर्व  घटना डी.वाय.एस.पी.च्या समाेर घडली आसताना ताेंडावर बाेट ठेऊन का आहेत.यामुळे पाेलीस खात्यावरील विश्वास उडेल असे बाेलले जात आसून सर्वसामान्य नागरिकांना किरकोळ घटनांतून कायद्याच्या कचाट्यात अडकवणारे पोलीस मात्र आपल्या चुकांवर पांघरून घालत असून चूकीला माफ न करता पाेलीस आधिक्षक मनाेज पाटील यांनीच लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे. या घटनेबाबत पोलीस डायरीत नाममात्र नोंद करण्यात आल्याचे समजते

Pages