विधानसभेच्या जादा जागा मागा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत झाला निर्णय .. - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, August 28, 2019

विधानसभेच्या जादा जागा मागा; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत झाला निर्णय ..

   सेनेला कितिमिळणार जागा.?

विशेष/प्रतिनिधी

जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. मागील विधानसभा शिवसेना-भाजप स्वबळावर लढले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत युती होणार हे गृहीत धरून जास्तीत-जास्त जागा पक्षाकडे मागण्याचा निर्णय आज झालेल्या भाजप जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक आज हॉटेल लोटस येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पणनमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, अविनाश कोळी, राजकुमार पाटील, शिवाजी गायकवाड, श्रीनिवास करली, बाबा बडवे, शकुंतला नडगिरे यांच्या उपस्थितीत झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे काही कारणामुळे बैठकीला अनुपस्थिती होते.

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत भाजपकडे अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर व माळशिरस हे तीन विधानसभा मतदारसंघ होते. 2014 च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वबळावर लढल्याने 11 पैकी दोन जागांवर भाजपचे आमदार निवडून आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील भाजपची स्थिती चांगली असल्यामुळे 11 पैकी जास्तीत-जास्त जागा मागण्याचा विचार या बैठकीत केला. शिवसेना-भाजपची युती जरी झाली नाही तरी भाजपने 11 जागांवर आपली तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जास्त जागा भाजपला मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचेही बैठकीत ठरले. मात्र, त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच घेणार आहेत.

करमाळा शिवसेनेला द्या
जिल्ह्यात करमाळा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे ती जागा शिवसेनेला सोडावी. उर्वरित 10 ठिकाणी भाजपकडे सक्षम उमेदवार असल्याने जास्तीत-जास्त पक्षाकडे मागण्याचा निर्णय बैठकीत झाला.

Pages