धनश्री परिवाराच्या वतीने 1 सप्टेंबर ला नोकरी महोत्सव... - Divyaprabhat News

Breaking News

Friday, August 30, 2019

धनश्री परिवाराच्या वतीने 1 सप्टेंबर ला नोकरी महोत्सव...


धनश्री परिवाराच्या वतीने 1 सप्टेंबर ला नोकरी महोत्सव...


मंगळवेढा/प्रतिनिधी

      धनश्री परिवाराचे संस्थापक, प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या संकल्पनेतून धनश्री परिवार आयोजित सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी रविवार दि. १ सप्टेंबर रोजी यशवंत मैदान, इंग्लिश स्कूल, मंगळवेढा येथे भव्य मोफत नॊकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती धनश्री मल्टीस्टेट मंगळवेढाच्या संचालिका तथा उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ.राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड यांनी  दिली आहे.
       या महोत्सवात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील ४० च्यावर मॅन्युफॅक्चरिंग, फार्मासी, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग, टेलिकॉम, आयटी, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, सिक्युरिटी आदी क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. आय.टी. आय. पास तसेच बारावी, बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी, एम.ए. एम.कॉम, एम.बी.ए, इंजिनिअरिंग डिप्लोमा सह अंतिम पदवी परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
      तरी मुलाखतीसाठी उमेदवारांनी आपल्या बायोडाटाच्या (C.V.) किमान 3 प्रती, पासपोर्ट साईज फोटो व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. उमेदवारांना आपली नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीनेdhanashriparivar.jobshowcase.in या संकेतस्थळावर करता येणार आहे. तसेच या बाबत अधिक माहितीसाठी 9970520524 / 9860190990 / 9766102960 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त तरुण तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.राजलक्ष्मी काळुंगे - गायकवाड यांनी केले आहे.

Pages