कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या कलेची सहकारमंत्री देशमुख व खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडून कौतुक - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 27, 2019

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या कलेची सहकारमंत्री देशमुख व खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडून कौतुक


अडीच हजार जणांनी दिली चित्र प्रदर्शनास भेट

सोलापूर/प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या कलेची सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी कौतुक केले. डॉ. फडणवीस यांनी अतिशय सुंदर चित्रे काढली असून त्यांची कला म्हणजे दैवी देणगीच आहे. वारली, नेचर, फिलामेंट प्रकारची चित्रे पाहून मन आनंदित झाल्याचे गौरवोद्गार  खासदार डॉ. महास्वामी यांनी काढले.
  श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्या चित्र प्रदर्शनाचा समारोप सहकारमंत्री देशमुख आणि खासदार डॉ. महास्वामी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
  चित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर सहकारमंत्री देशमुख म्हणाले की, जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व असून यातून जीवन जगण्याला एक नवी ऊर्जा प्राप्त होत असते. प्रत्येकाकडे एक वेगळी कला असते, त्या कलेला व्यासपीठ मिळणे फार महत्त्वाचे असते. कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात काम करत असतानाही चांगली कला जोपासली आहे. सुंदर चित्रे त्यांनी काढली आहेत. यावेळी खासदार डॉ. महास्वामी यांनीही कुलगुरूंच्या चित्रांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
     शेवटच्या दिवशी चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कलाप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रिसिजन कॅमशाफ्टचे चेअरमन यतीन शहा, संचालिका सुहासिनी शहा, करमाळ्याचे विलासराव घुमरे, प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, प्राचार्य डॉ. आर. वाय. पाटील, प्राचार्य डॉ. कॅप्टन कीर्ती पांडे आदींनी चित्र प्रदर्शनास भेट देऊन कलेचा आनंद घेतला. तीन दिवस चाललेल्या या चित्रप्रदर्शनास सुमारे अडीच हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली.
    सोलापूर: कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या चित्रप्रदर्शनास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भेट दिली.

सोलापूर: कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची चित्रे पाहताना खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी


Pages