स्पर्धा परीक्षेमध्ये हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क महत्त्वाचे आहे - प्रियांका भोसले - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, August 21, 2019

स्पर्धा परीक्षेमध्ये हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क महत्त्वाचे आहे - प्रियांका भोसले





नंदेश्वर/प्रतिनिधी

       स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबर योग्य दिशेने अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजेच हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करणे गरजेचे आहे असे मत केंद्रीय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका भोसले हे नंदेश्वर येथे देवसागर साधक ट्रस्टच्या वतीने आयोजित स्पर्धा परिक्षावर मार्गदर्शन व्याख्यानात बोलत होत्या या स्पर्धा परीक्षा व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन समर्थ सद्गुरू बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासो महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर पिंताबर भोसले,माजी सरपंच गेणा दोलतडे,रासपचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष धनाजी गडदे,पोलिस-पाटील संजय गरंडे, अँड.सुभाष शेजाळ,पत्रकार तानाजी जाधव,धिरज साळुंखे,कांचन करे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रियांका भोसले म्हणाल्या की,स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना दररोज नित्यनेमाने वर्तमानपत्र वाचणे गरजेचे आहे त्यामुळे चालू घडामोडीचा मोठ्या प्रमाणात अभ्यास होण्यास मदत होते तसेच पायाभूत अभ्यासावर भर देणे गरजेचे आहे.त्याचबरोबर मुलाखतीला जात असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मोठ्या आत्मविश्वासाने शांतपणाने उत्तरे द्यावीत.त्याचबरोबर त्यांनी यापुढील काळात महीलांच्या समस्या,विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टीवर मात करण्यासाठी लवकरात लवकर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नावर त्यांनी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांना अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या शंकेचे निरसन केले.
यावेळी या स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन व्याख्यानासाठी मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणाहुन विद्यार्थी,पालक,शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महादेव क्षिरसागर यांनी केले.

Pages