हरित वसुंधरा फाऊंडेशनचा वर्धापनदिन ; पाचशे रोपांचे मोफत वाटप.. - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 20, 2019

हरित वसुंधरा फाऊंडेशनचा वर्धापनदिन ; पाचशे रोपांचे मोफत वाटप..








सोलापूर/प्रतिनिधी


         येथील हरित वसुंधरा फाउंडेशनने वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधत ' एक व्यक्ती एक झाड' हा उपक्रम राबवला होता या उपक्रमात सहभागी होण्यासाठी हरित वसुंधरा फाउंडेशन कडे ऑनलाईन व फोनद्वारे सोलापूर शहर व परिसरातील पाचशे लोकांनी सहभाग नोंदविला होता.
      हरित वसुंधरा फाउंडेशन या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट २०१६ रोजी झाली होती सुरवातीच्या काळात शहरातील काही अभियंत्यांनी एकत्र येत ह्या संस्थेची स्थापना केली होती मात्र अल्पवधीच ही संस्था संपूर्ण शहर व जिल्हात नावारुपाला आली.गेल्या अडिच वर्षात हरित वसुंधरा फाउंडेशन ने अडिच हजार रोपांचे मोफत वृक्षारोपण केले होते.आजच्या स्वातंत्र्यदिनी ह्या संस्थेला तीन वर्षे पुर्ण होत आहेत ह्याच वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहरातील सात रस्ता परिसरात आज पाचशे रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी एका झाडाची प्रतिकृती तयार करून एक झाड आपल्याला किती महत्वपूर्ण गोष्टी देत असते असा संदेश देण्यात आला.
  वाढतं तापमान,प्रदुषण, पाऊसाचे कमी जास्त होत असलेले प्रमाण ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता वृक्ष लागवड अन् संवर्धन हाच एकमेव पर्याय आहे हे ओळखुन हरित वसुंधरा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असल्याचं मत संस्थेचे अमित बनसोडे यानी व्यक्त केलं.यावेळी सिद्धेश्वर टेंगळे,प्रशांत गाजुल,सागर संभारंभ,तानाजी यादव,योगेश लोखंडे, नरेश गाजुल,द्वारकेश सावंत,सागर मुरडे, सागर चिंचोळकर,रोहन खंदारे,अजय आलटे, रोहित कसबे,उमाकांत गजेली,संतोष वायदंडे,राजा गन्नम उपस्थित होते.

Pages