सिंहगड पब्लिक स्कूल चा उत्कर्ष दिक्षित राज्यात बारावा - Divyaprabhat News

Breaking News

Wednesday, August 21, 2019

सिंहगड पब्लिक स्कूल चा उत्कर्ष दिक्षित राज्यात बारावा
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविले यश

पंढरपूर/प्रतिनिधी 
 सिंहगड पब्लिक स्कूल चा विद्यार्थी उत्कर्ष हनुमंत दिक्षित याने फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 85.31 टक्के गुणासह राज्यात बारावा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल 15 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा परिषद येथील संकुलनात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूर चे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संजय वायचळ, शिक्षणाधिकारी संजय राठोड  यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणात पालकही उपस्थित होते. 
या शाळेने यावर्षीही विविध परीक्षेतून आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तरी ही परंपरा कायम ठेवण्यासाठी या स्कूल च्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबिवले जात असतात. या यशाबद्दल स्कूल च्या प्राचार्या सौ. स्मिता नवले मुख्याध्यापिका सौ.स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Pages