नंदेश्वर येथे आज स्पर्धा परीक्षेवर प्रियांका भोसले यांचे व्याख्यान.. - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 18, 2019

नंदेश्वर येथे आज स्पर्धा परीक्षेवर प्रियांका भोसले यांचे व्याख्यान..मंगळवेढा/प्रतिनिधी

 नंदेश्वर ता मंगळवेढा येथे आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी ठिक चार वाजता समर्थ सद्गुरु बाळकृष्ण महाराज मंदिर संचलित देवसागर साधक ट्रस्ट यांच्यावतीने केंद्रीय सहाय्यक पोलिस आयुक्त प्रियांका पितांबर भोसले यांचे स्पर्धा परीक्षांवर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रियांका भोसले ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत भारत देशातून मुलींमध्ये प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला असून त्यांचे अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षेवर व्याख्यानाचे कार्यक्रम झालेले आहेत.
तरी मंगळवेढा शहर व तालुक्यातील शिक्षक,विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने नंदेश्वर येथील हनुमान मंदिराशेजारील सामाजिक बहुउद्देशीय सभागृहात ठिक चार वाजता उपस्थित रहावे असे आवाहन देवसागर साधक ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Pages