रक्षाबंधनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील सुमारे 27 हजार महिलांशी साधला भालके कुटुंबीयांनी संवाद - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, August 18, 2019

रक्षाबंधनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील सुमारे 27 हजार महिलांशी साधला भालके कुटुंबीयांनी संवाद
 मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील त्रिवेणी महिला विकास संस्थेच्या वतीने आ भारत भालके यांच्या संकल्पनेतून तालुक्यात
रक्षाबंधन सोहळ्याचे मंगळवेढा ,मरवडे,खुपसंगी,मारोळी, सिद्धापूर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्षाबंधन सोहळ्यास सुमारे 27 हजार महिलांनी उपस्थिती दाखवली यावेळी अनेक महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देत एक दिवस संसाराच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडत आनंदमय प्रसंगाचा आनंद लुटला तसेच यावेळी उपस्थित  आ भालके कुटुंबीयांनी  महिलांशी संवाद साधला आ.भारत भालके यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा येथे त्रिवेणी महिला विकास मंडळ  व जगदंब परिवार, जय मल्हार क्रिडा मंडळ,मरवडे येथे  त्रिवेणी महिला विकास मंडळ व छत्रपती परिवार मरवडे मारोळी येथे त्रिवेणी महिला विकास मंडळ व बागडे बाबा बहुउद्देशीय संस्था सिद्धपूर येथे त्रिवेणी महिला विकास मंडळ व सुशील चारीटेबल ट्रस्ट सिद्धापूर खुपसंगी येथे त्रिवेणी महिला विकास मंडळ व श्रीनाथ संस्था पाटकळ सामाजिक संस्थांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगळवेढा येथे विरशैव मंगल कार्यालयात आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्रीताई भारत भालके  यांनी सिध्दापुर येथील मल्लिकार्जून मंगल कार्यालयात  आमदार भारत भालके यांच्या सुनबाई  रूपाली व्यकंटराव भालके व पुतण्या  व्यकंटराव भालके मरवडे येथे प्रांजली शेखर भालके व पुतण्या  शेखर भालके, बहिण  ऊर्मिला पवार, लतिका पवार मारोळी येथील बागडे बाबा भक्ता आश्रम  डाॅ प्रणिता भगीरथ भालके खुपसंगी येथे हर्षराज बिले यांचे घरी  वैशाली पंजाबराव भालके व भाऊ  पंजाबराव भालके उपस्थित होते मा.भगीरथ दादा भालके सर्व कार्यक्रम स्थळी जाऊन महिलांना मार्गदर्शन करीत आ भारत भालके यांच्या रूपाने तुमच्या पाठीमागे कर्तृत्ववान भाऊ म्हणून लोकप्रतिनिधी  च्या नात्याने तुमची सेवा करीत आहे अशक्य 35 गाव योजनेस मंजुरी, 40 गावची भोसे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून हजारो मायभगिनींच्या डोक्यावरील हंडा दूर केला नानांनी आमदार म्हणून मिरवण्यापेक्षा तुमचा भाऊ म्हणून मतदार संघाची सेवा करण्यासाठी सक्षमपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे गेली दहा वर्षे तुम्ही केलेले प्रेम विसरणे शक्य नसल्याचे सांगत महिलांनी देखील अडीअडचणी व विकासकामांसाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी केले मंगळवेढा येथे 4200,खुपसंगी 5300,सिद्धापूर4100 मरवडे 5500 मारोळी7500  असा महिलांनी सहभाग नोंदविला होता या महिला मेळाव्यानिमित्त हळदी कुंकू, माहेरचा वानवला, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रीतीभोजन आदी कार्यक्रम आयोजित केले होते

फोटोओळी  मंगळवेढा तालुक्यात रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात  मारोली येथे बोलताना  डॉ प्रणिता भगीरथ भालके

Pages