युटोपियन शुगर्स येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर संपन्न.. - Divyaprabhat News

Breaking News

Saturday, August 10, 2019

युटोपियन शुगर्स येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर संपन्न..



   सध्याच्या धावपळीच्या जगात मानवाला नैसर्गिक व मानवनिर्मित अशा अनेकप्रकारच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांचे जीवन अतिशय धोक्याचे व असुरक्षित झालेले आहे. त्यापैकि बर्‍याच समस्या ह्या मानवी चुकांमुळे निर्माण होतात. त्यावर मात करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने घरगुती गॅस वापराच्या बाबतीत धोक्याच्या समस्या निर्माण होत असतात. आपत्ती व्यवस्थापनाचा वापर कसा करावा? या बद्दल च्या माहितीचा अभाव हे याचे मुख्य कारण असून शहरी व ग्रामीण अशा दोन्ही ही भागात याचे प्रमाण दिसून येते.या बाबत युटोपियन शुगर्स येथे आपत्ती व्यवस्थापन या विषयीचे मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
    यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, आपत्तीव्यवस्थापन अभियानाचे श्री.किरण माने,कामगार कल्याण अधिकारी रविराज पाटील,सुरक्षा अधिकारी शिवाजी माने यांचे सह सर्व अधिकारी खाते-प्रमुख,व कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.
   यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, आपत्तीव्यवस्थापन या विषयी लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याने साखर क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही नेहमी अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी या कारखान्याने सामाजिक बांधीलकीचा एक भाग म्हणून दि.07/08/2019 रोजी कारखाना कार्यस्थळावर आपत्ती व्यवस्थापन व उपाय योजना या विषयीचे मार्गदर्शन शिबीर श्री. किरण माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.
      या शिबिरामध्ये एल.पी.जी. म्हणजे काय?आगीच्या  दुर्घटना का घडतात?गॅस ची सुरक्षा कशी घ्यावी? तसेच आग लागल्याचे धोके व त्या बाबतचे व्यवस्थापन कसे करावे,जर आग लागल्यास घाबरून न जाता लागलेल्या आगीवर कसे नियंत्रण करायचे, तसेच ABC व BC सिलेंडर चे प्रकार या बाबत महत्वपूर्ण असे मार्गदर्शन श्री किरण माने यांच्या कडून करण्यात आले. या शिबिरामध्ये कर्मचारी वसाहतीतील महिलांनीही मोठ्या संखेने सहभाग घेतला. सदर प्रसंगी आग नियंत्रण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी कर्मचार्‍यांनी देखील आपल्या शंका मांडल्या या शंकांचे योग्य व अचूक निरसन श्री.माने यांच्या कडून करण्यात आले. तसेच असा सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याची युटोपीयन शुगर्स ने संधी दिल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व कारखाना व्यवस्थापनाचे आभार किरण माने यांनी मानले

Pages