आमदार श्री भारत भालके यांनी आपल्या 2 महिन्याच्या मानधनातून रू.3 लाखाची पुरग्रस्तांसाठी कपडे व जीवनावश्यक वस्तुंसाठी केली मदत - Divyaprabhat News

Breaking News

Tuesday, August 13, 2019

आमदार श्री भारत भालके यांनी आपल्या 2 महिन्याच्या मानधनातून रू.3 लाखाची पुरग्रस्तांसाठी कपडे व जीवनावश्यक वस्तुंसाठी केली मदत     सध्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूराने थैमान घातले असून तेथील जन-जीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. महापूरामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहेत. तसेच पशुधनांचेही बळी गेलेले असल्यामुळे लोकांमध्ये अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.  या पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी माझे कर्तव्य म्हणून मला आमदार म्हणून मिळणारे 2 महिन्याच्या मानधनाची रक्कम रू.3 लाखामधून 1 हजार साड्या व जीवनावश्यक - संसार उपयोगी बाबी व खाद्यपदार्थ इत्यादींची मदत सदर पुरग्रस्तांसाठी शासनाकडे सुपूर्द करीत असल्याचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री भारत भालके यांनी सांगितले.
             तसेच आपणही माणूसकी म्हणून पुरग्रस्तांना संस्कार-संस्कृती म्हणून मदत करून हातभार लावावा असे आमदार श्री भारत भालके यांनी आवाहन केले

Pages