मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर धनगर समन्वय समितीचे आमरण उपोषण मागे, आमदार प्रशांत परिचारक यांची मध्यस्ती यशस्वी.. - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, August 15, 2019

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर धनगर समन्वय समितीचे आमरण उपोषण मागे, आमदार प्रशांत परिचारक यांची मध्यस्ती यशस्वी..
धनगर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पंढरपुरात टिळक स्मारक येथे धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी 9 ऑगस्ट पासून अमरण उपोषण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती पांडुरंग मेरगळ यांनी दिली. 

धनगर समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांना या आंदोलनाची व्याप्ती सांगितली आणि आंदोलन कर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सतत चर्चा केली. त्याबद्दल धनगर समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आमदार प्रशांत परिचारक यांचे आभार व्यक्त करीत आहे. त्याच बरोबर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे आभार व्यक्त करतो आहे. 

आमदार प्रशांत परिचारक यांनी धनगर समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून यशस्वीरीत्या मान्य करण्यास सांगितले. त्यांच्या या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला. त्याबद्दल आम्ही सर्व धनगर समाज या सरकारचे आभार व्यक्त करतो. 

Pages