स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न - Divyaprabhat News

Breaking News

Thursday, August 15, 2019

स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न
     स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी  सचिन ढोले यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा  शासकीय कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सभापती राजेंद्र पाटील, सदस्य तानाजी वाघमोडे, तहसिलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  अनिकेत मानोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी हनुमंत बागल, नायब तहसिलदार एस.पी तिटकारे, सहाय्यक उपनिबंधक तांदळे, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, शकुंतला नडगिरे यांच्यासहस्वातंत्र्य सैनिक, नगरसेवक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी तसेच अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर पोलीस पथकाने मानवंदना दिली.      
तद्नंतर तहसिल कार्यालय पंढरपूर येथे उपस्थित  पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी व  नागरीकांनी तंबाखु व्यसनमुक्तीबाबतची शपथ घेतली

Pages