धक्कादायक :- भरधाव वाहनाच्या धडकेने एका शेतमजुराचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी ..... - Divyaprabhat News

Breaking News

Sunday, February 4, 2024

धक्कादायक :- भरधाव वाहनाच्या धडकेने एका शेतमजुराचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी .....

मंगळवेढा/प्रतिनिधी
मंगळवेढा शिवारातील ज्वारी काढणीचे काम करून घराकडे परतत असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जालीहाळ मधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.अपघातानंतर वाहनचालक फरार झाला.
या अपघाताची सविस्तर हकिकत अशी की, सध्या दक्षिण भागातील अनेक गावात मजुरांना हाताला काम नसल्यामुळे रब्बी हंगामात मंगळवेढा शिवारात ज्वारीची काढणीसाठी चांगली मजुरी मिळत असल्याने जावे लागत आहे,जालीहाळ येथील शिवाजी कांबळे व भारत व्हरगळ हे मंगळवेढा शिवारात ज्वारीचे काढणीचे काम संपवून दुपारी जालीहाळ येथील घराकडे दुचाकी क्र एम. एच. 14 ए यु 1729 वरून परतत असताना हिवरगाव ते जालीहाळ रस्त्यावर विद्यानिकेतन विदयालयाजवळ हाजापूर कडून भाळवणीकडे आलेल्या वाहनाने जोराची धडक देऊन शिवाजी कांबळे व भारत व्हरगळ या दुचाकीवरील दोघांना जोरीची धडक देत गंभीर जखमी केले तर शिवाजी कांबळे याचा जागीच मृत्यू झाला तर भारत व्हरगळ यास शासकीय रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पाठवण्यात आले.अपघातानंतर आयशर टेम्पो घटनास्थळी न थांबता फरार झाला.

Pages